सध्या गणेशोत्सवासह अनेक सणांची रेलचेल पाहायला मिळत आहे. या सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी जास्त असल्यामुळे यामध्ये भेसळ होण्याचे प्रमाणही जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मिठाई खाण्यासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही मिठाई सजवण्यासाठी सुका मेवा वापरला जातो, तर काहींवर चांदीचा वर्ख (silver work) वापरला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी वाढल्याने यामध्येही भेसळ होण्याची शक्यता आहे.


चांदीच्या वर्खच्या नावाखाली अॅल्युमिनियमचे वर्खही बाजारात विकले जातात. चांदीचा वर्ख लावलेली मिठाई  आकर्षक दिसत असली, तरी त्याच्या शुद्धतेबद्दल खात्री देता नसल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिलं जाऊ शकतं.


बनावट चांदीच्या वर्खमुळे आरोग्याचे अनेक नुकसान होऊ शकते. यामुळे कर्करोग, फुफ्फुस आणि मेंदूशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.


चांदीचे वर्ख असल्याने अशा मिठाई आकर्षक असतात आणि त्या लोकांना भेट म्हणून देणे आवडते. याशिवाय चांदीमध्ये जिवाणूविरोधी गुणधर्म असतात आणि ते त्यावरील जिवाणूच्या वाढीस प्रतिबंध करतात. 


मात्र अनेक मिठाई दुकानदार स्वस्त चांदीच्या वर्खचा वापर करतात ज्यामध्ये अॅल्युमिनियमसारख्या हानिकारक पदार्थाची भेसळ केलेली असते.  भेसळयुक्त चांदीच्या वर्खसह मिठाई खाल्ल्याने आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. 


भेसळयुक्त चांदीचे वर्ख कसे ओळखाल?


हातावर घासून पाहा


शुद्ध चांदीचे वर्ख बोटांनी चोळले असतास त्याचे कोणतेही ठसे उमटत नाहीत.  जर ते हाताला चिपकत असेल तर त्यात अॅल्युमिनियमची भेसळ असू शकते. तुमच्या तळहातामध्ये वर्ख घासून तुम्ही चांदीच्या वर्खची शुद्धता तपासू शकता. 


जर ते नाहीसे झाले तर ते शुद्ध आहे, परंतु जर ते तुमच्या तळहातावर राहिले तर ते भेसळयुक्त आहे.


जाळून तपासा


मिठाईमध्ये चांदीचे वर्ख शुद्ध आहे की नाही तपासण्यासाठी तेजाळण्याचा प्रयत्न करा आणि जर त्याचे गोळे बनले तर ते शुद्ध आहे.


जर त्यात अॅल्युमिनिअमची भेसळ केलेली असेल तर ते राख  मागे सोडते ज्याचा रंग तपकिरी किंवा काळा   असतो.