Siddhaanth Vir Surryavanshi Passed Away : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi) यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार जिममध्ये वर्क आऊट (Heart attack during workout) करत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेने कलाजगतात शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाजगताला मोठा धक्का ! या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन


सिद्धांत वीर सुर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi) यांच्या आधी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju shrivastav) यांचा जीममध्ये व्यायाम (Heart attack during workout)  करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack)  निधन झाल्याची घटना घडली होती. तसेच असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्याबाबत अशीच घटना घडली आहे. त्यामुळे जिममध्ये वर्कआऊट (Workout) केल्याने हृदयविकाराचा धोका (Heart attack) का वाढत आहेत? कोणत्या चुकांमुळे असं होत आहे हे जाणून घेऊयात. 


काय काळजी घ्याल? 


तुम्ही जिममध्ये व्यायाम (Workout) करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी तज्ज्ञ सांगतात की, तुमचे वय 50 पेक्षा जास्त असल्यास आणि तुम्ही जिममध्ये जाण्यास सुरुवात करत असाल, तर आधी हृदयरोगतज्ज्ञांकडून स्वतःची तपासणी करून घेणे किंवा तणावाची चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे.


तुम्हाला 'हा' त्रास होतोय का?


जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा व्यायाम करताना हलकी डोकेदुखी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम सुरू करावा. कोणत्याही प्रकारचा व्यायाम जास्त करणे टाळले पाहिजे. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मध्यम व्यायाम पुरेसा आहे. व्यायाम संतुलित पद्धतीने केला पाहिजे. व्यायामादरम्यान स्वतःला योग्यरित्या हायड्रेटेड ठेवा आणि पूर्ण वेळ जिममध्ये जाणे टाळले पाहिजे.


दरम्यान या काही गोष्टी आहेत, ज्या टाळल्या की जिममध्ये वर्कआऊट (Workout) करताना हृदयाविकाराचा धोका (Heart attack) टळू शकतो.