सूरत : सध्याच्या घडीला मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईलच्या अतिवापराने लहान मुलांमध्ये गेमिंगचं व्यसन दिसून येतं. मात्र हे व्यसन जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. या गेमिंगच्या व्यसनापायी गुजरातच्या सूरतमध्ये एका मुलाने आपल्या पित्याचा जीव घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत वडिलांनी मुलाला गेम खेळताना विरोध केला. आणि त्यानंतर या अल्पवयीन मुलाने वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे. सूरत शहरातील कवास गावाजवळ ही घटना घडली आहे. अर्जुन सरकार असं या व्यक्तीचं नाव आहे. अर्जुन आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. अर्जुन यांना त्यांच्या पत्नीने बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करत अर्जुन यांना मृत घेषित करण्यात आलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.


अर्जुन आठ दिवसांपूर्वी बाथरुममध्ये घसरुन पडले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यानंतर झोपेतून उठत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांची पत्नी आणि मुलाने दिलेल्या माहितीवर डॉक्टरांना संशय निर्माण झाल्याने त्यांनी अर्जुन यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं.


या पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अर्जुन यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे अहवालातून स्पष्ट झालं. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर पोलिसांनी अर्जुन यांची पत्नी आणि मुलाची कसून चौकशी केली. आपण मोबाईल गेम खेळत असताना वडील आपल्याला नेहमी ओरडायचे. मोबाईल गेम खेळायला ते विरोध करायचे. याचा राग आल्याने मंगळवारी वडील झोपले असताना आपण त्यांची गळा दाबून त्याची हत्या केल्याचं मुलाने सांगितलं.


यानंतर अर्जुन यांची पत्नी मुलाला अटक करण्यात आली आहे. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने काही मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. मात्र या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.