मुंबई : मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा रात्री उशीरा काम केल्यानंतर सकाळी पुन्हा कामाला बसायचं असल्यास आपल्याला फार कंटाळा येतो. मात्र अनेकदा असं होतं की, व्यवस्थित झोप झाल्यानंतर देखील दिवसा दमल्यासारखं वाटतं. अशावेळी आपण आजारी ततर पडलो नाही ना, असा प्रश्नही मनात येतो. मात्र घाबरू नका, अशा परिस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याची आपली जीवनशैली प्रचंड बदलली असून बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक अनावश्यक गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. अशाचवेळी व्यवस्थित झोप झाली असेल तरी देखील आपल्याला दिवसभर दमल्यासारखं वाटतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.


नियमित पाणी प्या


आपण महत्त्वाच्या कामात असतो त्यावेळी पाणी पिण्याचं विसरून जातो. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जर कमी झालं तर त्यामुळे देखील आपल्याला दमल्यासारखं वाटतं. याशिवाय आपले शरीर नेहमीपेक्षा कमी कार्य करतं.


कॉफीचे प्रमाणात सेवन करा 


कॉफी किंवा कॅफेनयुक्त पदार्थांचं प्रमाणात सेवन केलं पाहिजे. जर आपण दिवसातून 1-2 कप कॉफीचे सेवन करत असू तर त्यामुळे आपला उत्साह टिकून राहतो परंतु हे प्रमाण त्यापेक्षा जास्त वाढलं तर थकवा येऊ शकतो. 


वेळेवर नाश्ता करा


तुमच्या दिवसातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नाश्ता. रोज सकाळी नाश्ता केलात तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. अशात तुमच्या जेवणाच्या वेळा देखील तंतोतंत पाळल्या पाहिजेत. जर तुमच्या नेहमीच्या जेवणाची वेळ चुकली तर त्यामुळे देखील तुम्हाला बाकी दिवसभर थकवा जाणवू शकतो. 


जेवणाचं प्रमाण


कधीही प्रमाणापेक्षा जास्त जेवू नका. कारण यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते. यासोबतच दोन किंवा तीन वेळेस भरपूर खाण्यापेक्षा सहा वेळेस थोडं थोडं खा.