नवी दिल्ली : जगभरात महिला पुरुषांहून अधिक धुम्रपान करत असल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) एका अहवालातून केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपानासारख्या गोष्टीमध्ये पुरुषांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी इतिहासात प्रथमच आली असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

World Health Organizationचे महासंचालक टेड्रोस अंधानोम गेब्रियासिस (Tedros Adhanom Ghebreyesus)यांनी सांगितलं की, गेल्या दशकांपासून पुरुषांमध्ये धुम्रपानाचं प्रमाण वाढत असल्याचं पाहण्यात येत होतं. परंतु पहिल्यांदाच विविध देशांतून आलेल्या आकडेवारीनुसार, महिला पुरुषांहून अधिक धुम्रपान करत असल्याची बाब समोर आली आहे. 


भारतातही ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हेमध्ये (GATS) तंबाकू आणि धुम्रपानाच्या बाबतीत महिला पुरुषांच्या आकडेवारीत अतिशय जवळ असल्याचं सांगण्यात आलं आहे. बीडी पिण्याच्या बाबतीत महिला आधीपासूनच पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती आहे.


विविध संशोधनांमधून धुम्रपान किंवा तंबाकू उत्पादनांच्या वापराने कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेने, जगभरात धूम्रपान आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त, १२ लाख लोकांचा केवळ निष्क्रिय धुम्रपानांमुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) मृत्यू होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.