मुंबई : प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणत्यातरी कारणाने आजारी पडतो. कधीकधी हा छोटा सामान्य आजार असू शकतो तर कधी एखादा गंभीर आजार. जर तुम्हाला तुमचं शरीर आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर एका गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे जीवनशैली. तुमची जीवनशैली चुकीची असेल तर ती वेळीच सुधारली पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचमध्ये फुफ्फुसं निरोगी राहणं हे देखील निरोगी शरीरासाठी एक मुख्य गोष्ट मानली जातं. सध्या कोरोना व्हायरसच्या काळात फुफ्फुसांसंदर्भात चिंता वाढली आहे. कोरोनाच्या विषाणूचा परिणाम हा रूग्णाच्या फुफ्फुसांवर होतो. ज्यामुळे रुग्णाची प्रकृती अधिकच वाईट होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपलं फुफ्फुस निरोगी आहेत की नाही हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. फुफ्फुसं निरोगी आहेत की नाही हे कसं जाणून घ्यावं.


सर्व प्रथम, तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. पायऱ्या चढताना, वेगाने चालत असताना किंवा घरातील कामं करताना तुम्हाला दम लागत असेल तर तुमचं फुफ्फुसं कमजोर असण्याची शक्यता आहे. असं असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.


हवामानातील बदलांमुळे आम्ही बर्‍याच वेळा खोकला येत असतो. परंतु जर आपला खोकला 8 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांद्वारे तपासणी करून घ्यावी.


जर तुम्हाला खोकताना किंवा शिंकताना छातीत वेदना होत असतील किंवा श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असेल, तर ही लक्षणं आहेत की तुम्ही त्वरित उपचार घ्यावेत.