Fitness Funda : जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊनमुले व्यायामशाळा, जिम इत्यादी बंद आहेत. अशातच फिट दिसण्यासाठी ब्रिटनमध्ये नवी शक्कल लढवण्यात आली आहे. सिलिक़ॉनपासून बनवलेला सूटचा वापर फिट दिसण्यासाठी करण्यात येत आहे.  यात सिक्स पॅकसारखे फीचर्स आहेत. ब्रिटनच्या आसपासच्या देशांमध्ये याची मागणी वाढली आहे.


मस्कुलर बॉडी सूट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बेत चांगली राहवी आणि शरीरयष्टी पिळदार राहावी यासाठी लोकं तासन् तास व्यायाम करतात. कोरोनामुळे गेल्यावर्षापासून जिम बंद आहेत. त्यामुळे लोकांना व्यायाम करणे शक्य होत नाहीये. अशातच ब्रिटनच्या पुरूषांमध्ये मस्कुलर बॉडी असलेला सूट लोकप्रिय होत आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार सूट घातल्यानंतर पुरूषांचे शरीर प्रोफेशनल बॉडी बिल्डर सारखे दिसते.


ब्रिटनच्या आजुबाजूच्या देशांमध्ये मागणी वाढली


मस्कुलर बॉडी सूटची विशेषता ही आहे की, पिळदार शरीरयष्टी दिसण्यासाठी व्यायामाच्या कष्टाची गरज पडत नाही. किंवा डायटिंगही करावी लागत नाही. फक्त सूट परिधान करा आणि मस्त दिसा. यामुळे या सूटची ब्रिटनच्या आजुबाजूच्या देशांमध्येही मागणी वाढली आहे.


सूटची किंमत


मेडिकल-ग्रेड सिलिक़ॉनपासून हा सूट तयार केला जातो.  सूटमध्ये तंदरूस्त हातांच्या नसा, शोल्डर, सिक्स पॅक सारखे फीचर उपलब्ध आहेत. आकर्षक दिसण्यासाठी विविध फीचर्स जोडले जातात.  


हा सूट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 9 ते 45 हजारापर्यंत उपलब्ध आहे.