Danda Yoga For Reducing Belly Fat:  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या नृत्यासोबतच तिच्या फिटनेससाठीही लोकप्रिय आहे. ग्लॅमरस आणि बोल्ड असलेल्या मलायकाने अलीकडेच तिचा 57 वा वाढदिवस साजरा केला होता. पण फिटनेसबाबत बोलायचे झाल्यास तिचे वय आजही 30च्या आत असल्याचेच जाणवते. मलायकाचे जिमचे फोटो व्हिडिओही खूप व्हायरल होत असतात. अलीकडेच तिचा एक योगा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात तिने केलेले काही आसन पाहून लोकंही हैराण झाले आहेत. योगाचा हा कोणता प्रकार आहे असा सवाल विचारत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोरा हिचे स्वतःचे फिटनेस स्टुडिओ आहे. अलीकडेच तिचा दंड योग करतानाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलेला आहे. हा योग प्रकार नेमका कोणता आहे? आणि याचे काय फायदे आहेत? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडताहेत ना. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. पाहूयात दंड योगा आणि त्याचे फायदे काय आहेत ते. 


पोटाचा घेर आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी दंड योगा हा उत्तम पर्याय आहे. हा योग प्रकार मलायकाच्या आवडत्या व्यायाम प्रकार असल्याचे तिने म्हटलं आहे. कंबरेच्या आसपासची चरबी कमी करण्यासाठी याचा अधिक फायदा होतो. काठीच्या सहाय्याने हा योग करता येतो. यामुळं हात-पाय आणि मणकाच्या मसल्सवर ताण येतो आणि त्यामुळं शरीराला आराम मिळतो. 


दंड योग कसा करतात?


दंड योगासाठी तुम्हाला एका काठीची आवश्यकता लागणार आहे. काठी घेऊन ती दोन्ही हातांनी डोक्याच्या वर ठेवा नंतर डावीकडे व उजवीकडे झुका असं पाच ते तीन वेळा करा. त्यानंतर एक पाय स्थिर ठेवून दुसरा पाय उचलून बाजूला घ्या. अशाच प्रकारे पाच ते सात वेळा करा. 


दंड योगाचे फायदे


या योगासनामुळं पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.


कंबरेच्या अवतीभोवती असलेली चरबी कमी होते. 


हाता-पायाच्या स्नायूंचे स्ट्रेचिंग होते.


हातावरच्या दंडावरील चरबी कमी होते.


रक्ताभिसरण व श्वसनप्रक्रिया सुधारते


काठी नसेल तर


दंड योगा करण्यासाठी काठी नसेल तर तुम्ही दुसऱ्या पर्यायांचाही वापर करु शकता. काठी नसेल तर एक टॉवेल किंवा पाण्याच्या बॉटलचाही वापर करुन तुन्ही या योगासनाचा सराव करु शकता. 


(Disclaimer:  कोणतेही योगासन करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही)