Weight Loss: वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. चुकीची लाईफस्टाईल आणि अयोग्य आहारामुळे वजनवाढीची समस्या अधिक बळावते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत तुम्ही तुमचं डाएट सुधारत नाही तोवर तुमच्या वजनात घट होणार नाही. अनेकदा आपण हीच चूक करतो. आणि याचमुळे तुमचं वजन कमी होण्याऐवजी वाढत जातं. यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रेकफास्टपासून सुरुवात करावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच चहासोबत खाली दिलेल्या पदार्थांचा वापर करू नका. यामुळे शरीरात फॅट वाढून वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.


नूडल्स


काही लोकं ब्रेकफास्टमध्ये नूडल्स खाणं पसंत करतात. न्यूडल्स चवीसाठी चांगले लागतात, मात्र हे हेल्दी ब्रेकफास्ट मानला जात नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला नूडल्स खाणं टाळा. यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.


चहासोबत कुकीज


चहामध्ये बिस्कीट बुडवून खाण्यास अनेकांना आवडतं. मुळात सकाळी चहासोबत बिस्किट खाण्याची अनेकांना सवय असते. असं केल्याने लोकं त्यांची भूक भागवतात. मात्र यामुळे बेली फॅट वाढण्यास मदत होते.


नमकीन खाणं टाळा


चहासोबत चिवडा किंवा शेव खाणं अनेकांना पसंत असतं. मात्र हे पदार्थ तळलेले असतात. ज्यामध्ये फॅटचं प्रमाण अधिक असतं. म्हणून हे चहासोबत खाणं टाळावं. यामुळे शरीरात फॅट वाढून वजन वाढू शकतं.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी २४तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )