प्रत्येक महिलेने अवश्य खावेत हे ८ पदार्थ!
फिट आणि सुंदर असावे, असे प्रत्येक महिलेला वाटते.
मुंबई : फिट आणि सुंदर असावे, असे प्रत्येक महिलेला वाटते. यासाठी आपल्या परिने ती प्रयत्नही करत असते. पण अनेकदा हे प्रयत्न बाहेरुन केले जातात. शरीराला आतूनही काही पोषकघटकांची आवश्यकता असते. त्यामुळे स्वास्थ आणि सौंदर्य टिकवण्यास मदत होते. मात्र यासाठी तुम्हाला काही पदार्थांचा नियमित आहारात समावेश करायला हवा. हे शक्य नसल्यास आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तुम्हाला हे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक महिलेने आहारात समावेश करावेत असे काही पदार्थ. पहा कोणते आहेत ते...
ब्रोकोली
ब्रोकोलीत भरपूर प्रमाणात व्हिटॉमिन सी असते. जे कोलाजेनच्या निर्मितीसाठी गरजेचे असते. ब्रोकोलीत बीटा कॅरेटीन असते. ज्याचे शरीर व्हिटॉमिन ए मध्ये रुपांतर करते. या व्हिटॉमिनमुळे पेशींच्या निर्मितीस मदत होते. जुन्या पेशींच्या जागी नव्या पेशी तयार होतात. त्याचबरोबर कन्सरशी लढण्यास कोबी, ब्रोकोली सारख्या भाज्या फायदेशीर ठरतात.
पालक
पालकात पोषक घटकांचा खजिना असतो. पालकात ल्यूटिन असते ज्यात अॅंटीएजिंग गुणधर्म असतात. पालकाच्या सेवनाने त्वचा स्वस्थ आणि हायड्रेट राहते.
डाळ
डाळीत कमी कॅलरीज आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. डाळींमुळे दिवसभराची आयर्नची गरज ३०% पूर्ण होते. भारतीय महिलांमध्ये आयर्नची कमतरता असून त्यामुळे त्यांना अॅनेमियाला सामोरे जावे लागते.
सफरचंद
सफरचंदामुळे इम्युनिटी वाढते. सफरचंदात क्वेरसेटिन नावाचे अॅंटीऑक्सिडेंट असते. त्यामुळे आजारांपासून लढण्याची शरीराची क्षमता वाढते.
मशरुम
मशरुममध्ये कन्सर प्रतिरोधक अॅंटीऑक्सिडेंट असतात. एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे की, रोज कच्चे मशरुम खाल्याने ब्रेस्ट कन्सरचा धोका ६४% कमी होतो.
अॅव्होकॅडो
पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी अॅव्होकॅडो अतिशय फायदेशीर ठरते. त्याचबरोबर यात असलेल्या मोनोसॅच्युरेडेट फॅट्समुळे वजन कमी करण्यास मदत होते.
मका
मका उत्तम अॅंटीएजिंग असून मका खाल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
पिस्ता
पिस्तात प्रोटीन, हेल्दी डाएट फॅट्स, कॉपर, फॉस्फोरस, व्हिटॉमिन ई, व्हिटॉमिन ई, व्हिटॉमिन बी६, ल्यूटीन आणि मॅग्नेजीन असते. हे सर्व घटकात अॅंटीएजिंग गुणधर्म असातात.