मुंबई : सामान्यपणे वयाच्या 18 वर्षापर्यंत उंची वाढते. त्यामुळे मुलांची योग्य वयात पुरेशी वाढ आणि उंची वाढावी याकरिता पालक प्रयत्न करत असतात. अनेकजण उंची वाढवण्यासाठी औषधांचा वापर करतात. मात्र मुलांच्या आहारात औषधांऐवजी काही भाज्यांचा, पोषक घटकांचा समावेश केल्याने मुलांची उंची वाढायला मदत होते.  


मुलांची उंची वाढवायला मदत करणारे पदार्थ  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांना नियमित किमान एक अंड खाण्याला द्या. अंड्यातील प्रोटीन घटक मुलांच्या शारीरिक विकासासोबतच उंची वाढवायलाही मदत करतात. 


सोयाबीन हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. यामुळे मुलांचा शारीरिक विकासही होतो. वाढत्या वयानुसार मुलांची हाडं आणि मांस पेशी मजबूत होण्यासाठी मदत होते.  


चिकनमध्येही मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन घटक असतात. मुलांना चिकन खाण्याची सवय लावा. यामुळे केवळ हाडांना बळकटी मिळत नाही तर सोबतच मुलांची उंची वाढायलाही मदत होते.  


ग्लासभर दूधदेखील मुलांना फायदेशीर आहे. दूधातील कॅल्शियम घटक मुलांच्या वाढीला मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी ग्लासभर दूध प्यायला दिल्यास त्यांची हाडं मजबूत होतात. मुलांची उंची वाढायला मदत होते.