वजन वाढवण्यासाठी आहारात या हेल्दी पदार्थांचा समावेश करा!
फिट, टोन्ड बॉडी व्यक्तिमत्त्वात भर घालते.
मुंबई : फिट, टोन्ड बॉडी व्यक्तिमत्त्वात भर घालते. यासाठी व्यायामासोबतच आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. बर्गर, पिझ्झा यांसारखे फास्ट फूड, जंक फूड यामध्ये खूप कॅलरीज असतात. त्यामुळे वजन तर वाढेल पण आवश्यक तो पोषकघटक शरीराला मिळणार नाहीत. म्हणून वजन वाढवण्यासाठी भाज्या, फळे, फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. पाहुया वजन वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारत समावेश करावा.
केळ
वजन वाढवण्यासाठी केळ अवश्य खा. एका केळ्यात १०५ कॅलरीज असतात. यात कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात असून त्यामुळे चटकन ऊर्जा मिळते.
लोणी
लोण्यात सॅच्युरेडेट फॅट्स असतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी लोणी उत्तम ठरते.
चिकन
स्वादिष्ट असण्याबरोबरच त्यात प्रोटीन उत्तम प्रमाणात असतात.
अंड
वजन वाढवण्यासाठी प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेले अंडे रोज खाणे गरजेचे आहे.
दूध
दूध हे पूर्णान्न आहे. म्हणजे यात सर्व पोषकतत्त्व आहेत जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रोज दोन ग्लास दूध प्या.
ओट्स
ओट्समध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर यात आयर्नचे उत्तम प्रमाण असते.
बटाटा
वजन वाढवण्यासाठी आहारात ४०% कार्बोहाइड्रेट असणे गरजेचे आहे. यात ग्लूटामिन आणि आर्जनिन सारखे अमिनो अॅसिड असते. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
सोयाबीन
वजन वाढवण्यासाठी आवश्यक प्रोटीन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज सोयाबीन खाणे सुरु करा.