मुंबई : पोटदुखी, पोट फुलणे, ढेकर आणि पोटात गॅस होणे यांसराख्या समस्यांना गॅस्ट्रीक समस्या असे म्हटले जाते. या समस्या विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्याने उद्भवतात. त्यामुळे या समस्यांपासून सुटका करण्यासाठी या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. पहा कोणते आहेत ते पदार्थ...


कोबी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोबी पचण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे कोबीमुळे अपचन, गॅस आणि गॅस्ट्रीक सारख्या समस्या उद्भवतात. विशेषतः रात्री ही समस्या अधिक जाणवते.


काकडी


काकडीचे अधिक सेवन गॅसची समस्या अधिक गंभीर करते. काकडीत पाण्याचा अंश आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. पण काकडी खाल्याने पोट फुगल्यासारखे वाटते आणि हेच गॅसचे कारण बनते.


बटाटा


बटाटा कोणाला आवडत नाही? पण बटाटा खाल्याने पोट फुगल्यासारखे वाटते. बटाट्यात मोठ्या प्रमाणावर स्टार्च असते. त्यामुळे अपचन होते आणि गॅसची समस्या वाढीस लागते.


मोसंबी


खूप अधिक प्रमाणात मोसंबी खाल्याने गॅस होतो. यात भरपूर प्रमाणात व्हिटॉमिन सी असते, त्यामुळे पोटाच्या समस्या वाढतात. त्यामुळे गॅसची समस्या असलेल्यांनी मोसंबी ज्यूस पिणे, खाणे टाळावे.


कलिंगड


पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्यांनी कलिंगड खाणे देखील टाळावे. पाणी आणि फायबर्सचे अधिक प्रमाण असल्याने याचे पचन होण्यास वेळ लागतो. यातील शुगर मेनीटोलमुळे पोट फुगते आणि ढेकर येतात.