मुंबई : शरीरासाठी सर्वच व्हिटॉमिन्स, मिनरल्स आवश्यक असतात. पण त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी काही विशेष व्हिटॉमिन्स, मिनरल्स घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्वचेचे सौंदर्य खुलते. त्वचा टोन होते. हायड्रेट राहते. त्याचबरोबर त्वचा फ्रेश, टवटवीत दिसते. तसंच ओपन पोर्सची समस्या दूर होण्यासही मदत होते. त्यासाठी महागड्या प्रॉड्क्सऐवजी हे नैसर्गिक उपाय नक्की करुन पहा...


पपई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेच्या देखभालीसाठी पपई अत्यंत लाभदायी असते. त्वचेची चमक वाढवण्यासाठी पपई फायदेशीर ठरते. यात व्हिटॉमिन ए, सी आणि पपेन असते, जे अॅंटीऑक्सीडेंट्सने भरपूर असते. त्यामुळे डेड सेल्स दूर होतात. त्यामुळे त्वचा फ्रेश, टवटवीत दिसते. त्यामुळे तुमचे वयही कमी भासते. पपई दुधासोबत मॅश करा आणि चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. त्वचा चमकू लागेल.


टॉमेटो


यात कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॉमिन सी, अॅंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा दूर होतो. चेहऱ्याचे पोर्स ओपन झाल्याने त्यात घाण जमा होते. त्यासाठी टॉमेटोत लिंबाचा रस घालून लावा. ओपन पोर्स दूर होण्यास मदत होईल. याशिवाय टॉमेटोत ओटमील आणि दही घाला. ते त्वचेवर लावून ५ मिनिटे ठेवा. त्वचा उजळेल.


डाळींब


यात कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॉमिन सी, ए, ई मुबलक प्रमाणात असते. डाळींब खाल्याने रक्तसंचार उत्तमरीत्या होतो. शरीरात रक्त कमी असल्यास डाळींब खा किंवा डाळींबाचा ज्यूसही तुम्ही घेऊ शकता. याच्या सेवनाने त्वचा चमकदार होईल. 


कोरफड


कोरफडीत व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, व्हिटॉमिन बी १, बी १२, बी ६, नीयोसिन आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. वयानुसार चेहरा उतरु लागतो. वय चेहऱ्यावर दिसू लागतं. कोरफडीच्या रसाने चेहरा चमकू लागतो. सुरकुत्या कमी होऊ लागतात. कोरफडीच्या गराने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचा टोन होते. यातील एन्झाईम्समुळे मृत त्वचा दूर होते आणि त्वचा हायड्रेट होते.