मुंबई :  जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ज्यांनी सर्व प्रकारचे उपाय करुन पाहिले आहे आणि तरी देखील त्यांना काही फरक जाणवला नसेल, तर अशा लोकांसाठी काळी मिरी एक चांगला पर्याय असू शकतो. तज्ज्ञांच्या मते काळी मिरी वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही ते कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. काळी मिरीचा वापर चहामध्ये केला जातो, तसेच जेवणाची चव वाढवण्यासाठी देखील काळी मिरी वापरली जाते. म्हणजेच ज्या लोकांना झपाट्याने वजन कमी करायचे आहे, त्यांनी ताबडतोब आपल्या आहारात काळी मिरी समाविष्ट करावी.


काळी मिरी चयापचय वाढवते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यासाठी काळी मिरी खूप फायदेशीर आहे. कफ, खोकला, सर्दी बरे करण्यासोबतच याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. काळ्या मिरीमध्ये हेल्दी फॅट, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि डायटरी फायबर असतात.


काळ्या मिरीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. याशिवाय, त्यात एक सक्रिय घटक असतो, ज्याला पाइपरिन म्हणतात. यामुळे चयापचय वाढण्यास मदत होते.


वजन कमी करण्यासाठी काळी मिरीचा वापर


चहामध्ये काळी मिरी टाकून तुम्ही त्याचे सेवन करु शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी नक्कीच मदत मिळेल. काळी मिरीचे सेवन करण्याचा चहा हा सर्वात सोपा मार्ग आहे.


काळी मिरीच्या चहामध्ये आले, मध, तुळस, दालचिनी, लिंबू आणि ग्रिन टीचा वापर करु शकता.


याशिवाय तुम्ही कोणत्याही भाज्या किंवा कोणत्याही पेयामध्ये काळी मिरी मिसळून पिऊ शकता.


काळी मिरी चे सेवन कोणत्या वेळी करावे?


काळ्या मिरचीचा चहा आणि काळी मिरीचे सेवन नाश्त्यापूर्वी करावे. यातून तुम्हाला अधिक फायदा होईल. याशिवाय, जर तुम्ही थेट काळी मिरी खाण्याचा विचार करत असाल तर सकाळी याची पावडर तुमच्या डिटॉक्स ड्रिंकमध्ये घाला.


न्याहारी नंतर आणि आधी खा.


तुम्ही एक ग्लास फळांचा रस काळी मिरीसोबत पिऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.