प्रजनन क्षमतेवर परिणाम करतायत तुमच्या दररोजच्या 4 सवयी!
जाणून घेऊया या समस्या कोणत्या आहेत.
मुंबई : पालक बनण्याचे समाधान प्रत्येक जोडप्याला मिळतं असं नाही. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार असं समोर आलंय की, सहा जोडप्यांमधील एका जोडप्याला गर्भ रहाण्याच्या समस्या असू शकतात. आजकाल जीवनशैली आणि आहारातील प्रत्येक गोष्ट तसंच छोट्या छोट्या आरोग्य समस्यांमुळेही गर्भधारणेत विलंब होऊ शकते. जाणून घेऊया या समस्या कोणत्या आहेत.
खूप जास्त झोप
फर्टिलिटी स्टेरिलिटी या मेडिकल मॅगझिनमध्ये झालेल्या अभ्यासाप्रमाणे, जे पुरुष दिवसातून 9 तासांपेक्षा अधिक झोपतात त्यांची प्रजनन क्षमता, दिवसातून 7 ते 8 तास झोप घेणार्या पुरुषांपेक्षा तुलनेत कमी असते. याचाच अर्थ बिछान्यात घालवलेला एक तासही संभावित हानी करु शकतो.
Aerated ड्रिंक्सची चटक लागणं
एरिएटेड पेयाच्या अतिरीक्स सेवनामुळे पुरुषांमधील स्पर्मची गतिमानता, न सेवन करणार्या लोकांच्या तुलनेत कमी होते. याशिवाय त्यातील उच्च साखरेमुळे लठ्ठपणाची समस्याही उद्भवते परिणामी हार्मोनल असंतुलन होऊन स्पर्मवर त्याचा प्रभाव होतात.
धूम्रपान
एका मोठ्या संशोधनानुसार, प्रजनन अक्षमता धूम्रपान करणार्या महिला आणि पुरुषांमध्ये, धूम्रपान न करणार्या लोकांच्या तुलनेत दुप्पट असते. महिलांमध्ये याचा परिणाम फिलोपिन ट्यूबमधून स्पर्मच्या स्थलांतरावर होतो. तसंच फलित अंड्यांना परत गर्भाशयात नेण्यावरही परिणाम होतो. इतकंच नाही तर याचा परिणाम म्हणजे यामुळे गर्भपाताचा धोका संभवतो. पुरुषात स्पर्मचा डीएनए प्रभावित होतो परिणामी प्रजनन अक्षमतेची समस्या उद्भावतात.
कॉफी आणि चहा याचं सेवन
कॅफिनेटेड टॅनिनचा संबंध गर्भपाताच्या वाढीव जोखीमीशी जोडला जातो. जास्त कॉफी प्यायल्याने गर्भार स्त्रीच्या गर्भातील बाळाच्या वाढीवर परिणाम होऊन गर्भपात लवकर संभवतो. हा परिणाम मात्रेशी संबंधित असून जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नये. दिवसातुन दोन वेळा एक्प्रेसो कॉफीमुळे पुरुषाची प्रजनन क्षमता प्रभावित होते.