Doctors Grown Nose On Woman Arm: विज्ञानामुळे प्रत्येक गोष्ट सोपी होत चालली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही रोज नवनवे प्रयोग केले जात आहे. आजरांचं निदान करण्यापासून योग्य उपचार केले जात आहेत. असाच वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार समोर आला आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींना भविष्यात बरीच मदत होणार आहे. फ्रान्समधील डॉक्टरांनी हा चमत्कार केला असून वैद्यकीय क्षेत्रातील मोठं आहे. डॉक्टरांनी एका महिलेच्या हातावर नाक उगवलं आहे आणि त्यानंतर सर्जरी करून चेहऱ्यावर बसवलं. फ्रान्समधील एक महिलेचं नाक कँसरमुळे कापण्यात आलं होतं. त्यामुळे तिच्या चेहऱ्याची ठेवण बिघडली होती. यावर डॉक्टरांनी यशस्वी प्रयोग करून तिला नाक पुन्हा बसवून दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, नेजल कॅविटी कँसरमुळे एका महिलेचं नाक कापावं लागलं. 2013 मध्ये हे सर्जरी करण्यात आली होती. कँसर नाकाद्वारे शरीरात पसरू नये यासाठी डॉक्टरांनी हे पाऊल उचललं होतं. तेव्हापासून 2022 पर्यंत जवळपास 9 वर्षे ती नाकाशिवाय जीवन जगत होती. अखेर डॉक्टरांच्या टीमने तिच्या चेहऱ्यावर नाक ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी 3 डी प्रिंटिंगच्या मदतीने हातावर नाक उगवलं आणि नंतर ट्रान्सप्लान्ट केलं. यात डॉक्टरांच्या पथकाला यश देखील आलं. त्या महिलेचा चेहरा आता पूर्वीसारखा दिसू लागला आहे.


Trending: एका रात्रीत महिलेचं नशिब पालटलं, जाणून घ्या कसे कमवले 3 कोटी!


अहवालानुसार, या प्रक्रियेत महिलेच्या हातावर नाक उगण्यासाठी स्किन ग्राफ्ट तयार करण्यात आला. त्यानंतर 3 डी नाकावर खरंखुरं नाक दोन महिने वाढू दिले. त्यानंतर त्याचे चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट करण्यात आले. नेजल कॅविटी कँसरमुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्रस्त रुग्णांच्या नाकभोवतीची क्रिया पूर्णपणे थांबते. काहीवेळा रुग्णांना नाक देखील गमवावे लागते. महिलेच्या बाबतीतही असंच झालं होतं.


डॉक्टर डुप्रेट यांनी सांगितलं की, "तिच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यास आम्ही उत्सुक होतो. नाकाने हातावर पूर्ण आकार घेतल्यानंतर नाक आणि चेहऱ्याच्या ब्लेड वेसिल्स जोडण्यासाठी मायक्रोस्कोपची मदत घेतली. महिला दहा दिवस रुग्णालयात होती त्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. आता ती व्यवस्थितरित्या श्वासोच्छवास करते आणि वासाचा अनुभवही घेते."