मुंबई : थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या पालकांनी विविध मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर पालकांनी सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांना भेटून आपल्या मागण्या आणि व्यथा मांडल्या होत्या. यावर आता सरकार पावलं उचलत असताना दिसत आहेत. 


मोफत थॅलेसेमिया मायनर टेस्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सहा ठिकाणी थॅलेसिमिया मायनर तपासणी मोफत सुरू करून देण्यात आली आहे. लवकरच 18 अन्य ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 


काय होत्या मागण्या ? 


थॅलेसेमिया मायनर टेस्ट मोफत उपलब्ध व्हावी. 


थॅलेसेमियाच्या रूग्णांसाठी NAT टेस्ट रक्त मोफत मिळावी अशा मागण्या थॅलेसेमियाच्या पालकांनी केल्या होत्या.  


प्रत्येक स्त्री रोग तज्ञांकडे थॅलेसेमिया तपासणी बंधनकारक करावी, अशीमागणी जेखील संघटनेतर्फे करण्यात आली होती. यासंदर्भात स्त्री रोग तज्ञांची संघटना फॉक्सी यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले आहे.  


कोठे मिळणार ही सुविधा ?


सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय  देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, केईएम रूग्णालय, मुंबई व बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे अशा सहा ठिकाणी थॅलेसेमिया मायनर टेस्ट मोफत स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे.


थॅलेसेमिया ओैषधांचा साठादेखील  मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा याकरिता देशमुखांनी निर्देश दिले आहेत. 


काही स्वयंसेवी संस्थादेखील थॅलेसेमियाच्या रूग्णांसाठी रक्ताची सोय करून देण्यास मदत करणार आहेत. 


2012 मध्ये 3640 थॅलेसेमियाचे रुग्ण होते. आता या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे.