Eaching and cancer : आपल्याला अनेकदा शरीरावर खाज सुटते. आपल्या त्वचेला सूट न होणारे कपडे घातल्यास, एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असल्यास किंवा कोणता कीटक चावल्यास आपल्या शरीरावर खाज सुटते. शरीरावर खाज सुटणे हे अतिशय सामान्य आहे. मात्र तुमच्या शरीरावर वारंवार खाज सुटत असेल तर मात्र तुम्ही सावध पवित्रा घेतला पाहिजे. कारण शरीरावर वारंवार खाज सुटणे हे चांगलं लक्षण नाही. शरीरावर वारंवार खाज सुटणे हे अतिशय गंभीर अशा आजाराचं लक्षण असू शकतं. सातत्त्याने शरीरावर खाज सुटणे हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यामुळे तुम्हालाही असं होत असेल तर अजिबात दिरंगाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तात्काळ औषधोपचार सुरु करा. नाहीतर हे तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. माणसाच्या शरीरातील स्वादुपिंडातील पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढल्यास ट्युमर तयार होतो. कालांतराने या ट्युमरचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवी शरीरातील स्वादुपिंडातील पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढल्यास ट्युमर तयार होऊन त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. यानंतर या पेशीही संपूर्ण शरीरात पसरून त्याने माणसाचा जीवही जाऊ शकतो. महत्वाची बाब म्हणजे स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणे प्रत्येकांमध्ये वेगवेगळी असू शकतात. यामध्ये पाठीत आणि पोटात दुखणं, अचानक कमी झालेली भूक, अचानक कमी झालेलं वजन, युरिन गडद पिवळ्या रंगाची होणं, काविळ होणं किंवा थकवा येणं अशी लक्षणं पाहायला मिळतात. यामधीलच एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे शरीरावर वारंवार खाज येणं हे देखील असतं.


स्वादुपिंड म्हणजे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग.  तुम्हाला निरोगी राखण्यासाठी तुमचं स्वादुपिंड तंदुरुस्त आणि निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पॅनक्रिया पोटाजवळ असलेला शरीराचा भाग आहे. ज्यामुळे आपण खाल्लेलं जेवण पचण्यास मदत होते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये काही बिघाड झाल्यास याचा तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम पाहायला मिळतो. 


खाज येत असेल तर सावध व्हा 


पित्तामध्ये असणारं बिलरुबीन नामक केमिकल काविळीचं कारण ठरतं. जेंव्हा आपलं लिव्हर या केमिकलला व्यवस्थित प्रोसेस करू शकत नाही, अशा वेळेस हे केमिकल अनियंत्रित होतं. यामुळे त्वचेवर आणि डोळ्यांमध्ये पिवळटपणा पाहायला मिळतो. पित्त नलिका यकृतापासून लहान आतड्यात पित्त प्रवाहित करत असते. अशात स्वादुपिंडाची गाठ म्हणजेच ट्युमर लिव्हरला पित्त सोडण्यापासून रोखते. यामुळे शरीरातील बिलिरुबीन केमिकलचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरावर थेट प्रभाव पडतो. शरीरावर खाज देखील येते. मात्र अनेकदा आपण नॉर्मल खाज असल्यासारखं वागून याकडे दुर्लक्ष करतो. मात्र सातत्याने तुम्हाला अशी खाज येत असेल तर मात्र हे गंभीर लक्षण आहे. खाज येण्यांनंतर पुढे त्वचेचा रंग देखील बदलतो. म्हणूनच तुम्हाला वारंवार खाज येत असेल तर डॉक्टरांना भेटून निदान करणं गरजेचं आहे. 


स्वादुपिंडाच्या कॅन्सरची कारणं काय?


सामान्यतः धूम्रपान, तंबाखूचं सेवन, जाड्यत्व किंवा कंबरेभोवती वजन वाढणे, जाड्यत्वाशी संबंधित टाईप 2 डायबिटीसमुळे स्वादुपिंडाचा कॅन्सर होऊ शकतो. 


स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं सहज निदान होतं का ? 


सुरुवातीला स्वादुपिंडाचा कॅन्सर सायलेंट असतो. हा कॅन्सर अतिशय गंभीर स्थितीमध्ये गेल्यावर याबाबत माहिती मिळते. अशा रुग्णांना एकाच वेळेस विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये शरीराचं मेटाबॉलिझम खराब होतं. स्वादुपिंडातील चांगल्या पेशी देखील व्यवस्थित काम करत नाहीत. हा ट्युमर शरीरातील इतर भागांमध्ये पसरतो.


कोणत्या गोष्टींची काळजी घावी 


स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं स्पष्ट कारण समजत नसलं तरीही काही गोष्टी ध्यानात ठेवल्यात तर आपण यापासून लांब राहू शकतो.  सर्वात आधी तुमच्या जेवण्याच्या वाईट सवयी बदला. आपल्याला होणाऱ्या विविध आजारांचं कारण आपल्या जेवणाच्या सवयी असतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. रंगेबिरंगी फळांचं सेवन वाढावा. तम्ही तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवल्यास तुम्ही विविध आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतात. मद्यपान आणि धूम्रपान करू नका. थोडातरी व्यायाम करा. 


frequent body eaching can be a major cause of pancreatic cancer