बंद दाराआड या `3` गोष्टी करा, आनंदात रहाल
आजकाल ताण तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे.
मुंबई : आजकाल ताण तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन न करू शकल्याने त्यामधून नैराश्य आणि आत्महत्येसारखे टोकाचे विचार येतात. काही ठिकाणी कामाचा ताण अनावर झाल्यास त्याचा निचरा करण्यासाठी पंचिंग बॅग ठेवलेली असते. त्यावर तुम्ही आपला राग काढू शकता. मात्र तुमच्या ऑफिसमध्ये ही सोय नसल्यास आणि कामाच्या ठिकाणी किंवा इतर ताण तणाव अति झाल्यासारखे वाटत असल्यास तुमच्या खोलीत बंद दाराआड या तीन गोष्टी अवश्य करा.
1. आरडाओरड -
टीव्हीचा, म्युजिक सिस्टीमचा आवाज वाढवा आणि शक्य असेल तितक्या मोठ्या आवाजात ओरडा. यामुळे तुम्हांला दोन फायदे होणार आहेत. ओरडल्याने, रडल्याने तुमचा ताण तणाव आणि राग हलका होण्यास मदत होते. या उपायामुळे दुसर्याचे मन दुखावण्याचा, त्यांच्यावर तुमचा राग निघण्याचा धोका कमी होतो.
लोकांना या प्रकारामुळे एखाद्या गाण्यावर थिरकत आहात असे वाटू शकते. मात्र वेळ निवडताना काळजी घ्या. रात्रीच्या वेळेस, शांत वातावरणात हा प्रकार करू नका.
2. साबणाचे फुगे उडवा -
ताण हलका करण्यासाठी साबणाचे फुगे उडवणे फायदेशीर आहे. या अॅक्टिव्हिटीमध्ये आपण दीर्घ श्वास घेतो. यामुळे शरीर रिलॅक्स होते. तुमच्याकडे सबणाचे फुगे उडवण्यासाठी आवश्यक सामग्री नसेल तर घरात काही फुगे फुगवण्याचा प्रयत्न करा. या अॅक्टिव्हिटीमुळे ताण हालका होतो.
3. तोडफोड -
घरातील अनावश्यक काही गोष्टी एकत्र करा. त्या गोष्टी फोडा. हो वाचायला विचित्र वाटत असले तरीही ताण कमी करण्याचा हा हमखास उपाय आहे. अनावर झालेला राग आटोक्यात ठेवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरणार आहे.
एरवी या गोष्टी चारचौघांत केल्याने लोकं तुम्हांला बालिश समजू शकतात. काही जणांवर लोकांकडून होणारी टिप्पणी ही त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.