Smart Pill For weight loss : वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आपणही फिट दिसावं यासाठी अनेकजण डाएट करतात तर काहीजण उपवास देखील ठेवतात. मात्र, काही केल्या वजन काही कमी होत नाही. अनेकांनी नवीन वर्षी वजन कमी करण्याता संकल्प देखील केलाय. अशातच आता तुमच्यासाठी गुड न्यूज समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी अशी एक गोळी बनवलीये, ज्यामुळे तुमचं वजन झटपट कमी होऊ शकतं. व्हायब्रेटिंग इंजेस्टिबल बायोइलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेटर (Vibrating Ingestible BioElectronic Stimulator) म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात व्हायब्रेटिंग इंजेस्टिबल बायोइलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेटर- VIBES नावाच्या स्मार्ट गोळीचे वर्णन केलंय. वजन कमी करण्याच्या तंत्रज्ञानाचे भविष्य म्हणून याचा उल्लेख करण्यात आला आहे. जर्नलमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ही गोळी भूक कमी करते. VIBES गोळीची कल्पना एमआयटीच्या माजी पदवीधर विद्यार्थिनी आणि पोस्टडॉक श्रिया श्रीनिवासन यांनी केली होती, ज्या बायोइंजिनियरिंगच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. 


नेमका दावा काय?


श्रिया श्रीनिवासन यांच्या संकल्पनेच्या VIBES चा प्रयोग मानवावर अद्याप करण्यात आला नाही. मात्र, डुकरावर करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये डुकरांनी पुढील अर्ध्या तासात सुमारे 40 टक्के कमी अन्न खाल्ल्याचं समोर आलंय. यामध्ये हायपोथालेमसला संप्रेरक पातळी वाढवण्याचे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटतं. Vibes गोळी जेवणाच्या 20 ते 30 मिनिटे आधी रिकाम्या पोटी घ्यावी जेणेकरून पोट थोडेसे जाणवेल. जेवणाच्या सुरुवातीलाच जाणवतं.


दरम्यान, मला वाटलं की आपण कंपनाद्वारे पोटातील स्ट्रेच रिसेप्टर्स सक्रिय करू शकतो आणि त्यांना संपूर्ण पोट भरलं आहे असं वाटू शकतो, ज्यामुळे तणावाची भ्रामक भावना निर्माण होऊ शकते जी हार्मोन्स आणि खाण्याच्या पद्धतींवर नियंत्रण ठेवू शकतं, असं श्रीनिवासन यांनी एमआयटी न्यूजशी बोलताना म्हटलं आहे. गोळी इतर पदार्थांसोबत वापरली जाऊ शकते. हे विष्ठेसह शरीरातून बाहेर टाकली जाईल. त्याचबरोबर या गोळीची किंमत 1 डॉलर म्हणजेच 84 रुपये असण्याची शक्यता आहे.