मुंबई : लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र लसूण हे कायमच शरीरासाठी फायदेशीर आहे असे नाही. प्रत्येक घरात लसूणचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पदार्थात लसूणचा वापर केल्याने पदार्थातील चव अधिक चांगली होते. लसूण खाल्याने शरीरा अधिक उत्कृष्ठ राहते. मात्र अनेकांसाठी लसूण ही विषापेक्षा कमी धोकादायक नाही. 


उपाशी पोटी लसूण खाऊ नका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपाशी पोटी लसूण खाल्यानंतर अनेकांना छातीत जळजळ, मळमळणे आणि उलट्या होण्याची समस्या जाणवते. लसणात काही विशिष्ट संयुगे असतात ज्यामुळे आम्लपित्त होऊ शकते असे मानले जाते. त्यामुळे रिकाम्या पोटी लसूण न खाण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची समस्या नक्कीच वाढेल.


औषधांसोबत करू नका लसूणचा वापर 


रिपोर्टनुसार, लसूणमुळे शरीरातील रक्त पातळ होण्यास मदत होते. यामुळे वार्फरिन, एस्पिरिन यासारख्या औषधांसोबत लसूणचा वापर करणे टाळा. 


यामुळे रक्त पातळ कमी करण्याची औषधे आणि लसूण यांचा सेवन एकत्र करणे टाळा. हे धोकादायक आहे. 


गर्भवती महिलांनी लसूणाचे सेवन टाळा 


गर्भवती महिला किंवा स्तनदा माता यांनी लसूणचा वापर टाळा. यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो. 


स्तनदा मातांनी लसूण खाल्ले तर त्यांच्या दूधाच्या चवात मोठा बदल होतो.