अहमदाबाद  : आधुनिक जगात वावरत असताना सामाजिक आणि पारंपारिक मान्यता देखील बदलत आहेत. समाजात आता असेही काही लोक आहेत, ज्यांना आपले लिंग बदल करण्यात विशेष वाटत नाही.  विशेषतः गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लिगं परिवर्तन (Gender Change) करण्याचा ट्रेंड समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 येथे अनेक असे लोक समोर आले आहेत. ज्यांनी आपले लिंग सर्जरी करून बदलले आहे. असे केल्यानंतर ही लोकं आपली नवी ओळख नेहमीच्याच गावी परिसरात कायम ठेवतात. ही चागंली बाब आहे, लोकं आता बदलांना सहजतेने स्विकारत आहेत.
 


एका वर्षी समोर आले शेकडो केसेस


एका अहवालानुसार प्लास्टिक सर्जन डॉ. हर्ष अमीनने सांगितले आहे की, ' 2020-21' मध्ये फक्त अहमदाबादमधील आकडा 1000 वर पोहचला आहे. वर्षभरात 50 ते 60 जणांनी लिंग परिवर्तनाबाबत चौकशी  केली आहे.


अहमदाबादमधील वरिष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये या सर्जरीची किंमत 8 लाख रुपयेपर्यंत आहे. बहुतांश लोक आपली ओळख लपवण्यासाठी ही सर्जरी युरोपात करतात. परंतु आता ट्रेंड बदलत आहे. 


अहमदाबादमध्येच 15 दिवसात 6 जणांची सर्जरी झाली आहे.


जन्माने पुरूष मनाने महिला


 लिंग परिवर्तन करण्याची इच्छा असलेल्या पुरूषांमध्ये असे परुष असतात ज्यांचा जन्म पुरूष म्हणून झालेला असतो. परंतू मनातून ते स्वतःला महिला मानतात.


महिलांसारखे रहायला त्यांना आवडतं. असे पुरूष ही गोष्ट कुटूंबाला सांगण्यास धजावत नाही. परंतु आता अनेक पुरूष असे आहेत. ज्यांना याविषयी उघडपणे बोलण्यास अडचण वाटत नाही.