Hair Tips in Monsoon: कधी ऑफिसला जाताना पाऊस पडतो, कधी ऑफिसमधून घरी जाताना त्यामुळे पावसाळ्यात छत्री असो वा रेनकोट आपण भिजतो आणि त्यात आपल्या केसही ओले होतात आणि खराब होतात. पावसाच्या पाण्याचा सर्वात वाईट परिणाम केसांवर होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसात केस ओले झाल्यावर ते चिकट होतात आणि खराब होऊ लागतात. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ करणे आणि केस कोरडे करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही पावसात भिजला असाल तर त्यानंतर नक्कीच तुमच्या केसांची काळजी घ्या.

शैम्पूने केस धुवा
- जर तुमचे केस पावसात भिजत असतील तर त्यानंतर केसांना शॅम्पूने धुणं खूप गरजेचे आहे. ओले झाल्यावर केस धुतले नाहीत तर पावसाच्या ओलाव्यामुळे केसांमध्ये बुरशी येऊ शकते. एवढेच नाही तर डोक्याला खाज येण्याची समस्या देखील वाढू शकते आणि त्यामुळे टाळूमध्ये संसर्ग देखील होतो.


केस विंचरणे 
- पावसात केस भिजल्यानंतर ते नीट विंचरणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही एक मोठा दात असलेला कंगवा घ्या. याने केस पूर्णपणे विंचरा. ओले झाल्यावर केसांना विंचरले नाही तर त्यामुळे केस अडकतात आणि तुटतात.


केस कोरडे होऊ द्या
- ओले केस कधीही बांधू नयेत. यामुळे केसांमध्ये फंगस वाढू शकते. केस चिकट असू शकतात. त्यामुळे तुमचे केस ओले झाले तर त्यानंतर केस कोरडे करा.


केस घट्ट बांधू नका
- पावसात भिजल्यावर केसांना घट्ट रबर बँडने कधीही बांधू नका.असे केल्याने तुमचे केस तुटू शकतात.


(Disclaminer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचारावर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)