कामात दिवाळीसाठी पार्लर गाठणं राहिलंच ना? घरच्या घरी करा वापरा शॉर्टकट
चेहऱ्यावरील थकवा, ड्रायनेस दूर करण्यासाठी आपल्या फेशियलची गरज भासते तेव्हा जाणून घेऊया घरच्या घरी फेशियल करण्याच्या टीप्स. आपण फेशियल अगदी पंधरा मिनिटांपेक्षाही कमी करू शकतो. त्यासाठी जाणून घ्या या स्टेप्स...
Easy Makeup Tips: लग्नासभारंभाप्रमाणेच दिवाळी हा एक सण आहे जो फार मोठया उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की खरेदी, फराळ आणि सजावट. त्यामुळे दिवाळीचा उत्सव हा सगळ्यांसाठीच मोठा आनंदाचा सण असतो. त्यातून आता गोष्ट येते ती दिवाळीला नटन्यामुरडण्याची. आपल्या सर्वांनाच यावेळी क्लिनअप, फेशियल (Facial Tips) अशा अनेक गोष्टी करण्याची गरज भासते. परंतु घरगुती काम आणि दिवाळीची खरेदी यातून आपल्याला फारसा वेळ मिळतं नाही. तेव्हा काळजी करून नका या काही टीप्स जर (Facial at home) तुम्ही फोलो केल्यात तर तुम्हाला ना पार्लरचा खर्च येईल ना कसला. (getting ready for diwali avoid parlour and use these tips to do easy facial at home)
चेहऱ्यावरील थकवा, ड्रायनेस दूर करण्यासाठी आपल्या फेशियलची गरज भासते तेव्हा जाणून घेऊया घरच्या घरी फेशियल करण्याच्या टीप्स. आपण फेशियल अगदी पंधरा मिनिटांपेक्षाही कमी करू शकतो. त्यासाठी जाणून घ्या या स्टेप्स...
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
फेशियल (Facial) करण्यापुर्वी आधी केस बांधा. शरीर नीट झाकून घ्या. क्लिंजिंग करण्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या.
क्लिन्जर नसेल तर.... (Cleansing)
क्लिन्जर नसेल तर दह्याचा वापर तुम्ही करू शकता. दोन चमचे दही, मध आणि लिंबाचा रस लावून तुम्ही क्लिनअप करू शकता. दहा मिनिटांनी हा लेप काढा आणि पाण्यानं धुवा. प्रदुषणामुळे खराब झालेला चेहरा पुर्वव्रत होईल.
यानंतर तुमच्याकडे एखादं स्क्रब असेल तर त्याने चेहऱ्याला मसाज करा. चेहरा जोरजोरात न रगडता हलक्या हाताने मसाज करा.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
स्क्रब नसेल तर... (Scrub)
घरी स्क्रब नसेल तर दोन चमचे दूध घ्या, त्यात एक चमचा बेसन पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ घाला. थोडा मध घालून हे सगळे चांगले एकत्र करा आणि या स्क्रबरने चेहरा स्वच्छ करा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
यानंतर फेसपॅक (Face Pack) दहा मिनिटे लावून सरळ पाण्यानं चेहरा धुवून टाका. या प्रक्रियेनं तुम्हाला तजेलदार आणि ग्लो मिळू शकतो.