मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना लसीकरणासंदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोवोवॅक्स (Covovax) लसीला लहान मुलांवरील ट्रायलला मंजूरी देण्याची शिफारस केली आहे. यावेळी कमिटीने काही अटींसोबत 2 ते 17 वयोगटातील मुलांवर कोवोवॅक्सच्या ट्रायलला मंजूरी देण्याची शिफारस दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर ही मंजूरी मिळाली तर ट्रायलमध्ये देशभरातील 920 मुलांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये 2 ते 17 वर्षांच्या लहान मुलांचा समावेश असणार आहे.  यामध्ये या मुलांचा दोन गटांमध्ये विभागणी केली जाणार. पहिला गट 2 ते 11 या वयोगटातील लहान मुलांचा असेल. तर दुसरा गट हा 12 ते 17 वयोगटातील मुलांचा असणार आहे. प्रत्येक गटात 460-460 मुलं असणार आहेत आणि 10 जागांवर ही ट्रायल केली जाणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन (CDSCO) यांनी कोरोनासाठी तयार केलेल्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने मंगळवारी 2 ते 17 वर्षांच्या मुलांवर कोवोवॅक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी सीरम इंस्टिट्यूटला मंजूरी देण्याची शिफारस केली आहे. 


सीरमने परवनागी मागितली होती


पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटने लहान मुलांवरील लसीच्या ट्रायलला परवानगी मागितली होती. सीरमचे गवर्नमेंट एंड रेगुलेटरी अफेयर्सचे डायरेक्टर प्रकाश कुमार सिंह आणि डायरेक्टर डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या म्हणण्याप्रमाणे, जगभरातील 18 वर्ष आणि त्यावरील व्यक्तीचं लसीकरण केलं जातंय. ज्यानंतर या व्यक्ती काही प्रमाणात कोरोनापासून सुरक्षित होतील. मात्र लहान मुलांना या व्हायरसपासून मुलं संवेदनशील राहतील. 


ते पुढे म्हणालेत की, अशा मुलांना संसर्ग होऊन त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्याचप्रमाणे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता आहे. जितक्या लवकर या लसीला मंजूरी मिळेल तितक्या लवकर देशात लस उपलब्ध होईल.