कणीस खाण्याचे आहेत हे मोठे फायदे, पाहा काय सांगतात न्यूट्रिशनिस्ट
कणसाच्या एकएक दाण्यात मोठे गुणधर्म आढळतात. ज्याचा आपल्या आरोग्याला मोठा फायदा होतो.
मुंबई : पावसाळा सुरु झाला की गरमागरम कणीस खाण्याची इच्छा होतेच. पावसात कणीस खाण्याची मज्जाच वेगळी असते. बहुतेक लोकांना कणीस खायला आवडतं. पण त्याचे फायदे काय हे अनेकांना माहित नसतील. मक्याची गणना जगभरातील लोकप्रिय धान्यांमध्ये केली जाते. हे सहसा पिवळे असते परंतु लाल, केशरी, जांभळे, निळे, पांढरे आणि काळा यांसारख्या इतर अनेक रंगांमध्ये देखील आढळते. मक्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनीही मक्याला सुपरफूड म्हटले आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये कॉर्नच्या सेवनाच्या पद्धतीसह त्याचे आरोग्य फायदे देखील शेअर केले आहेत. ती म्हणते की कॉर्न तुमचे आरोग्य राखण्यासाठी तसेच चेहरा आणि केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकते.
कणीस खाण्याचे फायदे
मधुमेह नियंत्रित करते
डोळ्यांसाठी फायदेशीर
वजन नियंत्रणात मदत करते
लोहाची कमतरता पूर्ण करते
अशक्तपणा टाळण्यास मदत होते
हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
पचनशक्ती राखते
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते
हाडे मजबूत करते
अल्झायमरमध्ये उपयुक्त
यामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अॅसिड आढळतात, जे तुमचे केसाचे आरोग्य चांगले ठेवतात आणि पांढरे होण्यापासून रोखतात. तसेच यामध्ये असलेल्या फायबरच्या मदतीने तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. या व्यतिरिक्त, या अन्नधान्याचे सेवन करून, आपण आपली चव खराब न करता आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करू शकता.