H3N2 Virus Update : गेल्या काही दिवसांपासून H3N2 या विषाणूने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारतात सुमारे 3 महिन्यांनंतर 500 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. तर इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली तर या विषाणूपासून आपण दूर राहू शकतो. हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधी होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने प्रत्येकाने हात स्वच्छ धुतले पाहिजे... त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? या विषाणूजन्य आजारांमध्ये हाताच्या स्वच्छतेची काळजी घेणे का गरजेचे आहे? 


हात स्वच्छता का महत्त्वाची?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हात धुणे हा संसर्गजन्य (H3N2 Virus) रोग टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग असू शकतो. H3N2 विषाणू (H3N2 Virus) असो किंवा कोरोना विषाणू (Corona Virus) असो, दोन्ही श्वसनाचे संसर्गजन्य रोग आहेत आणि त्यांचा संसर्गाचा पहिला स्रोत फुफ्फुसे आहे. अशा स्थितीत संसर्ग होताच शरीरात खोकला, सर्दी आणि श्वासोच्छवासाच्या समस्या दिसू लागतात. या दरम्यान, श्वास, थुंकणे आणि शिंकणे हे हवेमध्ये पसरतात. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा स्थितीत वारंवार हात धुणे संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.


वाचा: भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, जाणून घ्या संपूर्ण गणित


हात स्वच्छ कसे धुवावेत


कोरोना आणि H3N2 व्हायरसपासून बचाव करण्यासाठी साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा. तसेच दर काही तासांनी हँड सॅनिटायझर वापरा.


व्हायरसपासून बचावासाठी या गोष्टी आवश्यक


  • चेहऱ्याला किंवा नाकाला स्पर्श करणे टाळा. त्यामुळे संसर्ग पसरू शकतो.

  • गर्दिचे ठिकाणी टाळा आणि मास्क वापरा.

  • तुम्ही आजारी जर असला तर संसर्ग कमी होईपर्यंत 7 दिवस घरीच थांबा

  • शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाकावर हात किंवा रुमाल ठेवा

  • हँडशेक आणि मिठी यांसारख्या जवळचा संपर्क टाळा जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीच्या हवेच्या थेंबाशी संपर्कात येऊ नये.

  • तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, भरपूर पाणी प्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.