Hair Care Tips: आपल्या वाढत्या दगदगीमुळे आपल्याला आपल्या केसांच्या सौंदर्याकडे लक्ष देणे सहज शक्य होत नाही. आपल्यालाही आपल्या केसांची काळजी (Hair Health) असते परंतु वाढत्या कामाच्या व्यापामुळे आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देणेही खूप कठीण होऊन जाते. त्यातून शहरी भागात राहणाऱ्या महिलांच्या समस्याही फार वेगळ्या आहेत. त्यांना रोजच प्रदुषण, स्ट्रेस, कामाचा ताण, वैयक्तिक चढाओढ आणि मानसिक आरोग्य यांचा सातत्यानं सामना करावा लागतो आहे त्यामुळे केसगळती, कोंडा, केस चिकट होणे, घाम येणे, स्कॅल्प ऑईल (Scalp Oil Problem) आणि केस खराब होण्याच्या समस्या या महिलांमध्ये वाढताना दिसत आहेत. परंतु यामुळे एकूणच बिघडत्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केसांचे आरोग्य बिघडू लागले आहे. (Hair care tips home made recipe of making green tea herbal shampoo trending news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण अनेकदा घाई गडबडीच्या नादात कुठेतरी महागड्या पार्लरमध्ये जाऊन हेअर ट्रीटमेंट घेतो आणि केसांची अजूनच वाट लावतो परंतु असे नसते कारण त्यात अनेक रसायने मिसळलेली असतात ज्याचा फायदा आपल्या केसांना काही काळापुरता होऊ शकतो परंतु कायमस्वरूपी मात्र त्याचा त्रासही होऊ शकतो. त्याचा साईड इफेक्ट्सही (Side Effects of Hair treatment) आपल्याला भोगावे लागू शकतात. आपल्याला यातून काहीतरी एक सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे त्यातून तुम्ही घरच्या घरी चांगल्यातला चांगला तोही नैसर्गिक पद्धतीनं शॅम्पू तयार करू शकता. 


ग्रीन टी शैम्पूचे फायदे काय आहेत? 


ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, अमिनो अॅसिड आणि झिंक यांसारखे पोषक घटक असतात. जे केसांच्या वाढीसाठी चांगले ठरतात. ग्रीन टी वापरल्याने केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. ग्रीन टी आपल्या केसांसाठी आणि स्कॅल्पसाठी फायदेशीर असते. ग्रीन टी शैम्पूने केसांना मसाज केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि ज्यामुळे केस जाड आणि मजबूत होतात. 


शैम्पू कसा तयार करायचा?


हिरव्या चहाची पाने, पेपरमिंट तेल, लिंबाचा रस, खोबरेल तेल, मध, सफरचंद सायडर व्हिनेगर यांसारखे साहित्या तुम्हाला हा शॅम्पू तयार करायला लागेल. 


ग्रीन टी शैम्पू कसा बनवायचा असतो?


सर्वप्रथम हिरव्या चहाची पाने सुकवून पावडर बनवा. ग्रीन टी पावडरमध्ये एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा. ग्रीन टी आणि ऍपल सायडर व्हिनेगरच्या मिश्रणात पेपरमिंट तेलाचे दोन थेंब घाला. यानंतर या मिश्रणात लिंबाचा रस, खोबरेल तेल आणि मध मिसळा.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)