Home Remedies To Get Rid Of Itchy Scalp: आजकाल बदलती जीवनशैली आणि प्रदूषणामुळे लोकांना केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत.तर काही लोकांना डोक्याला खाज सुटण्याचा त्रास होतो. बदलत्या ऋतूत आर्द्रता वाढल्याने डोके खाजायला लागते. याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याचबरोबर अनेक आजारांमुळे खाज येण्याची समस्या उद्भवू शकते.अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण जर तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब केला तर यातून सुटका होईल. अधिक उपाय करण्याबाबत जाणून घ्या.


डोक्याला खाज येण्याची कारणे- 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1- डोक्याला खाज धुळीमुळे होऊ शकते.
2- केसांमध्ये कोंडा असला तरी खाज येण्याची समस्या होऊ शकते.
3- काही वेळा तणावामुळेही डोके खाजायला लागते.
4-  टाळूच्या कोरड्यापणामुळे डोक्याला खाज येऊ शकते.
5- संसर्गामुळेही खाज येऊ शकते.


डोक्याची खाज दूर करण्यासाठी घरगुती उपाय


ऑलिव्ह ऑईल  (olive oil)-
जर तुम्ही टाळूवर खाज येण्याच्या समस्येने हैराण असाल तर डोक्याची खाज दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल डोक्याला लावा. आता तेल लावून काही वेळ मुळांमध्ये राहू द्या आणि 30 मिनिटांनी केस धुवा. असे केल्याने खाज येण्याची समस्या दूर होईल. तुम्ही हे आठवड्यातून 2 वेळा करू शकता. यामुळे तुमच्या केसांची खाज दूर होईल आणि केस दाट होतील.


व्हिनेगर (vinegar) -
डोक्यातील खाज दूर करण्यासाठी व्हिनेगर वापरा. याचा वापर करण्यासाठी पाण्यात व्हिनेगर मिसळून डोक्याला लावा. हे मिश्रण केसांत सुकल्यावर डोके धुवावे. पण हे लक्षात ठेवा की 2 चमचे पेक्षा जास्त व्हिनेगर वापरु नका.


लिंबू (Lemon)-
डोक्यात खाज येत असेल तर लिंबाचा वापर करावा. लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते. यामुळे टाळू साफ होतो. लिंबाचा वापर करण्यासाठी तेलात लिंबाचा रस मिसळा आणि मसाज करताना टाळूला लावा.


 


 


(Disclaimer:  येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.ZEE 24 TAAS  याची पुष्टी करत नाही.)