Hair Fall In Men: ...तर तुमचीही केस गळती थांबू शकेल, फक्त या गोष्टी पाळा
तुमच्याही बाबतीत असे होत आहे का?? कमी वयात जर तुमचे ही केस गळत असल्यास तुमच्या लाइफस्टाईल मध्ये योग्य तो बदल करुन घ्या.
Hair Fall In Men: सध्या धावपळीच्या आयुष्यात केस गळण्याचे प्रकार जास्त प्रमाणात समोर येताना पाहायला मिळतात. आपल्या खाण्या पिण्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. केस गळणे नॉर्मल आहे. पण त्याचा अतिरेक होत असल्यास तुम्हाला वेळीच काळजी घेणे खूप गरजेचे आहे. केस हे महिला आणि पुरुष या दोघांचेही गळताना दिसतात. पण हल्ली पुरुषांचे केस गळण्याचे प्रकार समोर योत आहेत. 35 ते 40 या वयात काही मुलांना केस गळण्यामुळे टक्कल देखील पडलं आहे. त्यामुळे पुरुषांच्या आत्मविश्वासावर त्याचा जास्त परिणाम होताना दिसतो. (Hair Fall In Men so you too can stop hair fall just follow these things nz)
केस गळण्यामागे बरीचशी कारणे आहेत त्यापैकी हार्मोनल बदल, तणाव, प्रदूषण, धूम्रपान, अनुवांशिकता ही प्रमुख कारणे आहेत. अशावेळेस या कारणांना दुर्लक्षित न करता त्यावर उपचार सुरु करा. सुरुवातीलाच हा विषय गांभीर्याने घेऊन त्यावर उपाय करा. तुमच्याही बाबतीत असे होत आहे का?? कमी वयात जर तुमचे ही केस गळत असल्यास तुमच्या लाइफस्टाईल मध्ये योग्य तो बदल करुन घ्या.
आणखी वाचा - Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हला चिट करतोय का? असं ओळखा
डॉक्टरांच्या मते, प्रथिने आणि लोहयुक्त संतुलित आहार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. तणावामुळे केस गळू शकतात. 21 वर्षाच्या आधी, 25% पुरुषांमध्ये केस गळण्याची लक्षणे दिसू लागतात आणि त्यानंतर 70% केस गळायला लागतात.
1. केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ शकते जर तुम्ही नियमितपणे केसांना तेल लावल्यास तुमच्या केसांची ग्रोथ वाढेल.
2. शॅम्पू आणि कडीशनर चा वापर करणे टाळा त्यात पेराबीन सारखे घटक असतात ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण जास्त दिसते.
3. केस सुकवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या केमीकलचा किंवा मशीनरीचा वापर करु नका अशाने तुमचे केस ड्राय होतील आणि हळूहळू त्यात कोंडा होऊन केस गळायला सुरुवात होईल.
जर तुम्ही सगळे उपाय करुन झाले असाल आणि तरीही केस गळणे थांबत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)