Hair Fall Problem:ओले केस असताना कंगवा फिरवल्यावर टक्कल पडते का? जाणून घ्या
Does Combing Wetty Hair Causes Hair Fall? : केसांसंंबंधीच्या अनेक समस्या महिलांना भेडसावत असतात. त्यातून एक समस्या म्हणजे केसांचे गळणे (Hair Fall Problems). त्यामुळे ओले केस असताना कंगवा फिरवावा की फिरवू नये यासंदर्भातही महिलांमध्ये संम्रभ असतो.
Hair Comb Rules: आपल्याला आपल्या केसांसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आपण केसांना तऱ्हेतऱ्हेचे हेअर ऑइल, सिरम लावत (Hair Tips) असतो. परंतु अनेकदा आपल्याला आपल्या केसांची काळजी घेता येईलच असं नाही. त्यामुळे काहीतरी उपाय करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. ऑफिसच्या दगदगीमुळे (Hair Fall Problems) आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला आपल्या केसांची काळजीही नीट घेता येत नाही. परंतु आपल्या केसांची काळजी घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यापैंकी अनेकांना काळजी असते की केस ओले असताना कंगवा फिरवायचा की नाही फिरवायचा? तेव्हा जाणून घेऊया की नक्की यावर तज्ञांचे काय मतं आहे.
तज्ञांच्या मते, ओले केस असताना कुठल्याही परिस्थितीत केसांवरून कंगवा फिरवू नका कारण कंगवा फिरवल्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात केसगळतीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी कंगवा ओल्या केसांवरून फिरवू नये. परंतु यामागील कारणं आहे तरी काय याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊया. काहींना असे वाटते की जर का आपण ओल्या केसांवरून कंगवा फिरवला (Do we have comb after shower) तर कंगवा फिरवणं जास्त सोप्पं जातं परंतु तसे नसते उलट त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागू शकते.
तज्ञांच्या मते जेव्हा आपले केस हे ओले असतात तेव्हा केस हे फारच कमजोर (Hair Fall News) असतात. त्यामुळे आपल्याला केसांची योग्य ती निगा त्या वेळात राखणं अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे जर का तुम्हाला कंगवा फिरवायचाच असेल तर तो ओल्या केसांमधून फिरवू नका तर थोडा वेळ थांबा आणि मग तुमचे केस वाळले की मग केसांवरून कंगवा फिरवा. तुम्ही जेव्हा ओल्या केसांवरून कंगवा फिरवता त्यावेळेला तुमचे केस हे जास्त खचले जातात आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणात केस कमजोर होतात.
असा कंगावा वापरा
एकतर जेव्हा तुमचे केस ओले असतात तेव्हा ते एकमेकांसोबत चकटलेले असतात त्यामुळे त्यातून कंगवा फिरवलात तर तुम्हाला त्याचा तोटा होऊ शकतो. जर तुमच्या कंगव्याचे दात लहान असतील तर तुम्हाला त्याचा विपरित परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे निदान तुम्ही जर का ओल्या केसांमधून कंगवा फिरवणार असाल तर निदान तुमच्या कंगव्याचे (Avoid These Mistakes While Combing Wet Hair) दात तरी मोठे असावेत. दिवसानं 2-3 वेळा तरी कंगवा फिरवावा त्यातून केसांना तेल लावणंही अत्यंत महत्त्वाचे आहे.