Hair Problem: कमी वयात केस पांढरे झालेत? कशी कराल मात, जाणून घ्या
आजकाळची जीवनशैली पाहता तरुण वर्गात केसांची समस्या जाणवते. अवघ्या 25 ते 30 या वयात केस गळणे, पांढरे होणे यासारख्या समस्या उद्भवतात.
White Hair Problem Solution: सुंदर दिसावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. यासाठी त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेतली जाते. व्यवस्थित असलेले केस सौंदर्यात भर घालतात. पण आजकाळची जीवनशैली पाहता तरुण वर्गात केसांची समस्या जाणवते. अवघ्या 25 ते 30 या वयात केस गळणे, पांढरे होणे यासारख्या समस्या उद्भवतात. कित्येकदा यामागे जेनेटिक कारण असल्याचं सांगण्यात येतं. पण कधी कधी आपली चुकीची जीवनशैलीदेखील यासाठी कारणीभूत ठरते. कमी वयात केस पांढरं होण्यामागे अनेक कारणं आहेत, जाणून घेऊयात. जंक फूड, अकारण चिंता घेणं, विटामिन आणि मिनरल्सची कमतरता, केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट, दारू आणि सिगारेटचं सेवन, अनुवंशिक कारण असू शकतो.
शॅम्पू दररोज वापरू नका: जर तुम्ही केसांसाठी रोज शॅम्पू वापरत असाल, तर आजच बंद करा. त्याऐवजी माइल्ड आणि ऑर्गेनिक शॅम्पू वापरा. कारण शॅम्पू आणि कंडीशनरमध्ये केमिकल असतं. त्यामुळे पिगमेंटवर प्रभाव पडतो आणि केस पांढरे होतात.
जंक फूड टाळा: आपल्या दैनंदिन आहाराचा देखील केसांवर परिणाम होतो. तेलकट, फास्ट आणि जंक फूडच्या सेवनामुळे केसांवर परिणाम होतो. त्यामुळे केस गळतीसोबत कमी वयात केस पांढरे होऊ लागतात. यासाठी विटामिन बी 12 युक्त फळं आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
केमिकलयुक्त तेल: जर तुम्ही केसांना केमिकलयुक्त तेल लावत असाल, तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे केसांची वाढ होण्याऐवजी केसगळती आणि अकाली पांढरे होऊ लागतात. केसांना बदाम, नारळाचे तेल वापरावे.
सिगारेट आणि दारुचं सेवन: सिगारेट आणि दारूमुळे आपली फुफ्फुस आणि यकृत खराब होते. इतकंच नाही तर केस लवकर पांढरे आणि कमकुवत होतात. या वाईट सवयी जितक्या लवकर सोडल्या जातील तितके चांगले.
अनावश्यक ताण घेऊ नका: केस पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अनावश्यक ताण घेणं. अनेकवेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते, परंतु आपण पुन्हा पुन्हा याचा विचार करून त्रास करून घेतो. आनंदी राहिल्यास केसांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)