हातापायांची त्वचा कोरडी पडतेय..करुन पाहा हे उपाय..
अनियमित आहारशैली, व्हिटॅमिन ई ची कमतरता, कॅल्शिअम आणि आयर्न मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे तुमचे हात आणि पायांची त्वचा कोरडी पडते.
BEAUTY HACKS: चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण बरच काही करत असतो. क्लीन अप, फेशिअल आणि ब्युटी एक्सस्पर्टनी सांगितलेल्या अनेक टिप्स आपण फॉलो करतो. पण याचवेळी आपण आपल्या हात, पायाच्या त्वचेकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या आणि हाता-पायांच्या त्वचेत खूप फरक जाणवतो. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कार्यक्रमास जातो तेव्हा सर्वात पहिल लक्ष आपल्या चेहऱ्यासोबतच हात आणि पायांवर जात. पण गरजेचं नाही की, फक्त बाहेर जातानाच हात किंवा पायांवर लक्ष द्यावं. चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे हात आणि पायांच्या त्वचेची सुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला हात-पाय कोरडे पडू नये म्हणून काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
अनियमित आहारशैली, व्हिटॅमिन ई ची कमतरता, कॅल्शिअम आणि आयर्न मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे तुमचे हात आणि पायांची त्वचा कोरडी पडते. म्हणून आपल्या डाएटवर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीनयुक्त आहार आपल्या त्वचेला पोषण देतो. त्यासाठी दररोज दूध,दही आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा.
सुंदर आणि मुलायम पायांसाठी घरगुती उपाय
१. लिंबू आणि मध
एका वाटीत थोडं मध आणि लिंबाचे काही थेंब एकत्र करा. या मिश्रणात ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन आपल्या पायांवर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. असे केल्यास पायांची त्वचा स्वच्छ आणि मुलायम दिसून येते. नंतर कोमट पाण्यात पाय टाकून ५ मिनिटांसाठी तसेच ठेवा.
२. हळद, बेसन आणि दही
दह्यात हळद आणि बेसनाचे एकत्र मिश्रण तयार करुन त्याचा पायांना स्क्रब करा. त्यामुळे पायांचे डाग हळूहळू दूर होतील.
३. ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइल
ग्लिसरीन आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन एका बाटलीत भरुन ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी पायांवर त्याचा मसाज करा. शक्य असल्यास रात्रभर तसेच ठेवल्याने फायदा होऊ शकतो.
४. कच्च दूध
कच्च्या दुधाने मालिश केल्यास तुमच्या पायांची त्वचा मुलायम होते. कच्च्या दुधात थोडं गुलाब पाणी एकत्र करुन मालिश केल्याने पायांना येणारी दुर्गंधी दूर होते. कच्च दूध वापरल्याने पायांची नखे स्वच्छ आणि चमकदार होतात.
५. दलिया
पायांवरची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी दलियाची पेस्ट वापर. यासाठी आठवड्यातून एकदा दलिया आणि कच्च दूध एकत्र करुन पेस्ट करा. ही पेस्ट पायांवर ५ ते १० मिनिटांसाठी लावून ठेवा.
सुंदर हातांसाठी घरगुती उपाय…
१. ऑलिव्ह ऑइल आणि साखर
ऑलिव्ह ऑईलच्या नियमित वापराने त्वचा मुलायम बनते. हातांना सातत्याने येणारा कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करते. एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडीशी साखर एकत्र करुन हातांना मसाज करा. आठवड्यातून असे दोन वेळा केल्यास फरक दिसून येतो.
२. गुलाब पाणी, लिंबू आणि ग्लिसरीन
ग्लिसरीन त्वचा मॉयश्चराइज्ड करण्यासाठी मदत करते. जर तुमचे हात कोरडे
पडत असतील तर गुलाब पाणी, लिंबू आणि ग्लिसरीन एकत्र करुन दररोज झोपण्यापूर्वी आपल्या हातांना मसाज करा.
३. क्रीम आणि बदामाचं तेल
रात्री झोपण्याआधी हातांना क्रिम लावण्यास विसरु नका. तसेच थोड्या मलाईमध्ये बदामाचं तेल एकत्र करुन हातांना लावा. त्यामुळे हातांचा नैसार्गिक रंग परत मिळवण्यासाठी मदत होते.
४. खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा
खोबऱ्याच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्वचेला जर संसर्ग झाला असेल तर खोबऱ्याचं तेल फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचं तेल हातांना लावून मालिश केल्याने हात सुंदर होतात. तसेच त्वचेला येणारा कोरडेपणा दूर होते.