तुमचे हात देखील थरथरतात? या गंभीर आजाराचे असतील संकेत
हँड डंबल एक्सरसाइजमधून तुम्हाला मदत मिळेल. हाताला येणारी थरथर आता व्यायामामुळे कमी होऊ शकते.
मुंबई : काही जणांचे काम करताना हात थरथरत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. ही समस्या एका वयानंतर होते. मात्र आता बदलती लाइफस्टाइल, वाढता ताण आणि अवेळी जेवण यामुळे आजच्या तरूण पिढीवरही ताण येत असल्याचं दिसत आहे. अशातच तरूणांचे हात थरथरत असल्याचं समोर आलं आहे.
असं म्हटलं जातं की, न्यूरोलॉजिकल स्थितीच्या कारणांमुळे हात थरथरू लागतात. रिपोर्टनुसार, ही स्थिती पार्किंसन रोगाच्या कारणामुळे होते.
या स्थितीवर वर्क आऊट केल्याने किंवा व्यायाम केल्याने काही परिणाम होतो का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
रबरच्या बॉलने एक्सरसाइज करा
रबरच्या बॉलने एक्सरसाइज केल्यानं हात थरथरणे कमी होते. रबरी बॉलला हाताने प्रेस केल्याने नस दबल्या जातात.
बॉलला हातात पकडून आणि त्याच्यावर प्रेशर आल्याने हातातील नसांवर चांगला परिणाम होतो.
हँड डबल एक्सरसाइज
हँड डंबल एक्सरसाइजमधून तुम्हाला मदत मिळेल. हाताला येणारी थरथर आता व्यायामामुळे कमी होऊ शकते.
या एक्सरसाइजच्या पार्किंसन आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.
फिंगर टॅप एक्सरसाइजमधून मिळेल मदत
फिंगर टॅप एक्सरसाइजमधून तुम्हाला मदत मिळेल. अभ्यासानुसार, तुमच्या बोटांना आणि हातांना नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.
फिंगर टॅप एक्सरसाइज एक साधारण एक्सरसाइज आहे. ज्यामुळे तुमची आखडलेली बोटं किंवा नियंत्रण सुटलेल्या बोटांवर नियंत्रण मिळवू शकतात.