Handshake And Health : हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन कळेल तुमचे आरोग्य, डॉक्टरांनी सांगितले संकेत
Shake Hand And Health : अनेकदा पहिल्यांगा भेटल्यावर आपण हस्तांदोलन करतो. प्रत्येकाची हात मिळवण्याची पद्धत वेगळी आहे. या पद्धतीवरुन कळेल तुमचं आरोग्य कसंय? हात मिळवण्यावरुन तुमच्या आरोग्याचे संकेत दिसू लागतात. डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट
Handshake and Health: शुभेच्छा देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी अनेकदा लोकं हस्तांदोलन करतात. लोक हस्तांदोलन हे अतिशय सामान्य संकेत समजतात. मात्र वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हात मिळवल्यावरही समोरच्या व्यक्तीच्या आरोग्याची माहिती मिळू शकते. तुम्ही जेवा कुणाचा हात हातात घेता तेव्हा त्या माणसाच्या आरोग्याची माहिती मिळते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याची माहिती मिळते. जसे की, तुम्हाला हृदयाची समस्या असेल किंवा डिमेंशिया किंवा डिप्रेशन सारख्या आरोग्य समस्यांची माहिती मिळेल. त्यामुळे हँडशेक करताना कोणते संकेत मिळतात ते जाणून घ्या?
हार्ट संबंधित समस्या
लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, जर कुणी अतिशय हलक्या पद्धतीने हात मिळवत अशेल तर भविष्यात त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येणार असं सांगितलं जातं. ब्रिटीश हार्ट फाऊंडेशननुसार 5000 लोकांवर संशोधन करून लोकांच्या हाताची पकड आणि ताकद यांच्यावर रिसर्च करण्यात आला. हाताची पकड कमकुवत असेल तर हृदयाची संबंधित धोका निर्माण होतो. क्वीन मेरीच्या विल्यम हार्वे रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधनाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर स्टीफन पीटरसन म्हणाले, 'हात पकडण्याची ताकद हृदयविकारासाठी एक जोखीम घटक आहे. हँडशेकवरुन आपल्या आरोग्याची समस्या ओळखा आणि उपचार करा.
डिप्रेशन
खराब मूड आणि कमकुवतपणा यांची चाचणी करण्यासाठी 45 वर्षांहून अधिक वयाच्या 51 हजारहून अधिक लोकांचा डाटा जमा केला. यानंतर नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये वैज्ञानिकांचा असा दावा आहे की, कमकुवत पकड असलेले लोक डिप्रशनचे शिकार असतात. डिप्रेशनमध्ये असलेले लोक कायम थकलेले आणि अशक्तपणाचे शिकार असतात.
हायपरहायड्रोसिस
हँडशेक करत असताना जर तुम्हाला सतत किंवा जास्त घाम येत असेल तर हायपरहायड्रोसिसचा आजार असू शकतो. याचा परिणाम म्हणून शरीराच्या इतर भागांवर त्याचा परिणाम दिसतो आणि घाम येतो. अनेक लोकांच्या तळव्याला आणि हाताला घाम येतो. ते नैराश्य, तणाव किंवा इतर वैद्यकीय समस्या दर्शविते.
संधिवात
अनेकांच्या हाताला घाम येतो किंवा हाताची पकड सैल झाल्यावर शारीरिक क्षमतेनुसार त्या व्यक्तीला संधिवाताचा त्रास असतो. या व्यक्तीला संधिवातच नाही तर स्मृतिभ्रंशचा त्रास देखील असल्याचं दिसून येतं.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)