मुंबई : सेक्स टाळण्यासाठी काहीजण डोकेदुखीचं कारण देतात. यावर अनेक प्रकारची मस्करीही केली जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, सेक्सशी संबंधित डोकेदुखी हा विनोद नाहीये. लोयोला युनिव्हर्सिटी शिकागो स्ट्रिच स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोलॉजी विभागातील न्यूरोलॉजीस्ट जोस बिलर, यांनी न्यूरोलॉजी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत हे घातक असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोफेसर बिलर यांच्या म्हणण्याप्रमाणे, "अनेकांना सेक्शुअल एक्टिव्हिटी करताना डोकेदुखी जाणवते. मात्र लोकं डॉक्टरांशी याबद्दल बोलण्यास संकोच बाळगतात आणि डॉक्टर सहसा त्यांच्याशी याबद्दल बोलत नाहीत. सेक्शुअल एक्टिव्हिटीशी संबंधित डोकेदुखी सौम्य ते गंभीर असू शकते. हे अत्यंत वेदनादायक असू शकते. ही डोकेदुखी पीडित व्यक्तीसाठी तसंच त्याच्या जोडीदारासाठी अत्यंत निराशाजनक ठरू शकते."


प्रोफेसर बिलर यांनी सांगितलं की, सुमारे 1% लोक सेक्शुअल एक्टिव्हिटी दरम्यान तीव्र डोकेदुखीची तक्रार करतात. या प्रकारची डोकेदुखी खूप तीव्र असते. डोकेदुखी सहसा मायग्रेन किंवा ताणतणावामुळे होते. तर सेक्शुअल एक्टिव्हिटीशी संबंधित बहुतेक डोकेदुखी सौम्य असतात." 


तज्ज्ञांच्या मते, फार दुर्मिळ प्रकरणांमध्ये डोकेदुखी जीवघेणी ठरू शकते. कारण ही डोकेदुखी ब्रेन हॅमरेज, स्ट्रोक किंवा सबड्युरल हेमेटोमामुळे देखील असू शकते. 


प्रोफेसर बिलर म्हणतात, 'त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आम्ही रुग्णाला संपूर्ण न्यूरोलॉजिकल तपासणी करून घेण्याची शिफारस करतो जेणेकरून नेमकं कारण शोधता येईल.'


सेक्ससंदर्भातील डोकेदुखी


इंटरनॅशनल हेडके सोसायटीने सेक्शुअल एक्टिव्हिटीशी संबंधित डोकेदुखीला तीन भागांमध्ये वर्गीणकरण केलं आहे. 


  • एक वेदना जी डोकं आणि मान मध्ये उत्तेजनापूर्वी सुरू होते आणि उत्तेजना वाढते म्हणून तीव्र होते. 

  • दुसऱ्या प्रकारची डोकेदुखी अतिशय तीव्र असते जी सेक्स दरम्यान सुरू होते आणि अनेक तास टिकते. अशा प्रकारची डोकेदुखी अचानक उद्भवते आणि डोक्याच्या मागच्या वेदना होतात. 

  • सेक्सनंतर तिसऱ्या प्रकारची डोकेदुखी जाणवते. ही सौम्य ते अत्यंत वेदनादायक असू शकते. या प्रकारची डोकेदुखी जाणवल्यास पाठीवर झोपल्याने आराम मिळतो.