मुंबई : ऑफिस म्हटलं की ताण-तणाव याला फाटा मिळणे तसे कठीणच. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सुखी मानसाचा सदरा मिळणं तसं कठिणच. पण, म्हणून काही या ताण-तणावात नेहमीच गुरफटून राहण्याची मुळीच आवश्यकता नाही. तुमच्या जोडीदारासोबतच म्हणजेच लाईफ पार्टनरसोबत तुम्ही धामाल मजा करूनही तुम्ही ऑफिसमधील नेहमीच्या ताण-तणावातून मुक्ती मिळवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...


टीव्ही पाहणे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑफिसमधून घरी आलात की, पार्टनरसोबत शेअर व्हा. एकट्याने टीव्ही पाहण्यापेक्षा पार्टनरलाही जोडीला घ्या. त्याच्यासोबत टीव्ही पाहा. त्यामुळे आपण मला वेळ देत नाही, अशी पार्टनरची तक्रार राहणार नाही. तसेच, तुम्हाला विविध विषयांवर गप्पा मारून आनंद घेता येईल. 


ऑफिसमध्ये घर घरात ऑफिस नको...


अनेक लोक ऑफिसचे काम खूपच मनावर घेतात. कामाची जबाबदारी स्विकारून नैतिकतेने काम करणे वेगळे आणि कामाची अती जबाबदारी तसेच, अती ताण घेणे वेगळे. पण, यातील सुक्ष्म फरक ध्यानात न आल्याने अनेक मंडळी ऑफिसचे काम घरात घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण कैक पटीने वाढतो. अशा वेळी हे लोक केवळ स्वत:च ताणात राहात नाहीत तर, त्यांच्या पार्टनरसह कुटुंबियांच्या ताणातही भर घालतात. अशा वेळी ऑफिस आणि घर यांच्यात गल्लत न करता घरी असल्यावर घरच्यांना प्राधान्य द्या.


आठवड्याची सुट्टी साजरी करा...


साप्ताहीक सुट्टी आपल्या कुटुंबासोबत साजरी करा. सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी सतत फोनला चिटकून राहू नका. तसेच, काही वेळासाठी जाऊन येतो म्हणून ऑफिसला किंवा ऑफिसच्या कामासाठी बाहेर पडू नका. पूर्ण वेळ सुट्टीचा आनंद घ्या. पार्टनरला वेळ द्या. त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. ताण कमी होईल.


ऑफिसचे प्रॉब्लम घरात नको...


अनेकांना सवय असते की, ऑफिसमधला ताण घरात व्यक्त करायची. पण, तसे करू नका. तुमच्या घरगुती किंवा खासगी अडचणींचे जसे ऑफिसला किंवा ऑफिसशी देणेघेणे नसते. तसेच, तुमच्या घरच्यांना तुमच्या ऑफिसमधल्या ताण-तणावाशी तसे घेणेदेणे नसते. घर आणि ऑफिस या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ऑफिसमधल्या ताणाचा घरावर परिणाम होऊ देऊ नका. 


डिनर प्लान


हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. अगदी नेहमी नसले तरी, कधीतरी का होईना ऑफिसमधून लवकर बाहेर पडा. पार्टनरसोबत छान तयार व्हा आणि डिनरला जा. तुम्हाला तो दिवस वेगळेच काहीतरी देऊन जाईल. नेहमीच्या ताण-तणावातून बाहेर पडण्यासाठी हा एक सुंदर मार्ग आहे.