तुमच्या पायातही निळ्या नसा दिसतात का? हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते
जर एखाद्याच्या पायात शिरा दिसत असतील आणि त्यांचा रंग निळा असेल, तर हे गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.
मुंबई : बर्याच लोकांच्या पायात आणि हातामध्ये आपल्याला शिरा किंवा नसा दिसतात, जे सामान्य आहे. या नसांचा रंग निळा किंवा जांभळा असू शकतो. परंतु जर जास्त प्रमाणात तुमच्या पायाच्या नसा दिसत असतील, तर माक्ष त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे गंभीर समस्यांचे लक्षण असू शकता. असे अनेक लोक आहेत ज्यांना आपली त्वचा पातळ व्हावी, म्हणजे हाताच्या नसा दिसतील असे वाटते आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करतात. हाताच्या नसा दाखवण्यासाठी ते डाएट आणि व्यायामही करतात. परंतु काही लोकांच्या शरीरात काहीही न करता, सामान्यपेक्षा जास्त शिरा दिसतात. या नसा हात, छाती, पाय आणि पाठीच्या स्नायूंमध्ये किंवा इतरत्र दिसू लागतात.
परंतु जर एखाद्याच्या पायात शिरा दिसत असतील आणि त्यांचा रंग निळा असेल, तर हे गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. निळ्या नसांना वैरिकास व्हेन्स म्हणतात आणि बहुतेक लोक पायांच्या या वैरिकास नसांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. तुम्हालाही तुमच्या पायात निळ्या नसा दिसत असतील, तर या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
काय आहेत वॅरिकोज वेन्स (What are varicose veins)
वॅरिकोज वेन्स या प्रामुख्याने हात, पाय, टाच, घोटा आणि पायाची बोटे यांमध्ये दिसतात. या सुजलेल्या आणि अधिक वळलेल्या शिरा आहेत, ज्याचा रंग निळा किंवा गडद जांभळा आहे. या नसांभोवती स्पायडर व्हेन्स असतात. या शिरा लाल आणि जांभळ्या रंगाच्या असून त्या दिसायला अतिशय पातळ आणि बारीक असतात.
जेव्हा स्पायडर व्हेन्स वैरिकास व्हेन्सला घेरतात तेव्हा त्यांना वेदना आणि खाज सुटते. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या वॅरिकोज वेन्स बहुतेक लोकांसाठी धोकादायक नसतात, परंतु काही प्रकरणांमध्ये ते काही गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.
वॅरिकोज वेन्सचे कारण
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या नसांच्या भिंती कमकुवत होतात तेव्हा वैरिकास नसा दिसतात. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील दाब वाढतो आणि त्या रुंद होऊ लागतात. यानंतर, शिरा ताणू लागल्यावर, रक्तवाहिनीमध्ये रक्त एका दिशेने वाहून नेणारे व्हॉल्व्ह योग्यरित्या काम करणे थांबवतात.
यानंतर, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होऊ लागते आणि नसांना सूज येऊ लागतात आणि त्या वळणे सुरू होते आणि नंतर ते त्वचेवर दिसू लागतात. शिराची भिंत कमकुवत होण्याची अनेक कारणे असू शकतात.
जसे की,
हार्मोनल असंतुलन
वृद्ध होणे
जास्त वजन असणे
बराच वेळ उभे राहणे
नसांवर दबाव
वॅरिकोज वेन्सनची लक्षणे
तज्ञांच्या मते, वैरिकास नसणे कोणालाही दिसू शकते आणि हे अगदी सामान्य आहे. जवळजवळ एक तृतीयांश तरुणांमध्ये वॅरिकोज वेन्स दिसून येते.
पसरलेल्या, सुजलेल्या निळ्या किंवा जांभळ्या शिरा हे वॅरिकोज वेन्स मुख्य लक्षण आहेत.
जर तुम्हाला तुमच्या पायातील नसांभोवती खाज येत असेल तर हे देखील वॅरिकोज वेन्सचे लक्षण आहे.
जर एखाद्याचे पाय सुजले असतील, जास्त शारीरिक हालचाल करत असतील, तर त्याला पायांच्या मागील बाजूस ज्या निळ्या रंगाच्या नसा दिसतील, त्या वॅरिकोज वेन्स असू शकतात.
वेदना: जर एखाद्याच्या पायांमध्ये, विशेषतः गुडघ्याच्या मागील बाजूस दुखत असेल. तर हे देखील वॅरिकोज वेन्सचे लक्षण असू शकते.
वॅरिकोज वेन्सचे धोके किंवा नुकसान (Complications of varicose veins)
वॅरिकोज वेन्स बहुतेक लोकांसाठी धोकादायक नसतात, परंतु काही लोकांमध्ये ते गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. उपचार न केल्यास, काही लोकांमध्ये अल्सर आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. त्याच वेळी, काही लोकांमध्ये गाठ देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत रक्त पंप करण्याच्या हृदयाच्या क्षमतेवर परिणाम होतो.
याशिवाय ज्या लोकांना वॅरिकोज वेन्सची समस्या आहे, त्यांच्या रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. जे शरीरासाठी खूप धोकादायक असू शकते आणि तुम्हाला माहिती आहे, की रक्त अडवल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये रक्तदाबाच्या व्यत्ययामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
व्हेरिकोज व्हेन्स, विशेषत: घोट्यांजवळील त्वचेवर अल्सरमुळे वेदनादायक व्रण होऊ शकतात. यामुळे त्वचेवर जखमा होऊ शकतात. त्यामुळे अशी काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.