Disadvantages of Sleeping Less Than 5 Hours: सुदृढ आरोग्यासाठी चांगला आहार, नियमित व्यायाम जितका महत्त्वाचा आहे तितकीच पुरेशी झोपही गरजेची आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. आरोग्या तज्ज्ञांच्या मते  मनुष्याने दिवसातून किमान आठ तासांच झोप पूर्ण करायला हवी.  झोप आणि मानवी आरोग्याचा जवळचा संबंध आहे. दिवसभरातील थकवा पूरेश्या झोपेमुळे कमी होतो. झोप ही कधीही आरोग्यासाठी लाभदायकच असते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कमीत कमी आठ तास झोप शक्य होतेच असं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या दैनंदिन कामकाजामुळे अनेकांना पाच तासांची झोपही मिळत नाही. पण याचा विपरीत परिणान आरोग्यावर होऊ शकतो. कमी झोप म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण असल्याचं आरोग्य तज्त्रांचं म्हणणं आहे.


1. स्मृती भ्रंश (Memory Loss)
जर आपण 5 तासांहून कमी वेळ झोप घेत असू तर त्याचा नकारात्म परिणाम आपल्या मेंदूवर होऊ शकतो. पुरेशा झोपेमुळे आपल्या मेंदूलाही आराम मिळतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. पण याऊलट आपली झोप अपूर्ण राहिली तर शरीराप्रमाणेच मेंदूही थकतो. आणि परिणामी कालांतराने स्मृती भ्रंशसारखा आजार जडू शकतो.


2. स्वभाव बदललं (Mood Swing)
पूरेशी झोप मिळाली नाही तर आपला मेंदू पूर्णपणे थकतो, याचा परिणाम आपल्या स्वभावावर देखील होतो. आपला स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. नैराश्य, चिंता आणि तणावाने ग्रासलं जाऊ शकतो. त्यामुळे किमान आठ तासांची झोपही गरजेचीच आहे. 


3. रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम ( Weak Immunity)
कोरोना महामारीनंतर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला डॉक्टर देतायत. यामुळे आजारांवर मात करता येऊ शकतो. अशात आपण 5 तासांपेक्षा कमी झोप घेतली तर याचा परिणाम शरीरातील रोग प्रतिकार शक्तीवर होऊ शकतो. मनुष्यातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आजार वाढण्याचा धोका असतो. 


4. मधुमेहाचा धोका (Diabetes Risk) 
अपुऱ्या झोपेचा सर्वात मोठा धक्का म्हणजे मधुमेह. मधुमेह हा भारताच नव्हे तर जगभरात गंभीर आजार बनला आहे. केवळ गोड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अनियमीत जेवणामुळे मधुमेहाचा धोका वाढत नाही तर अपुऱ्या झोपेमुळेही मधुमेहाचा धोका वाढू शकतो. 


सध्या मोबाईलमुळे आपला स्क्रिन टाईम वाढला असून त्याचा परिणामही झोपेवर होऊ लागला आहे. 
 
Disclaimer
: ही बातमी केवळ तुम्हाला जागरुक करण्यासाठी आहे. या बातमीसाठी घरगुती उपाय आणि सामान्य माहितीची मदत घेण्यात आली आहे. तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतेही उपाय किंवा उपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.