बद्धकोष्ठतेची समस्या आहे, तर हे 7 घरगुती उपाय करा?
आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे.
मुंबई : आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. पोट हा शरीराचा महत्वाचा घटक आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्धकोष्ठताची समस्या निर्माण होते. किंवा तिला आमंत्रण मिळते. बद्धकोष्ठतेतून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. ही समस्या सहजपणे दूर केली जाऊ शकते. त्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.
बद्धकोष्ठता होण्याचे मुख्य कारण
1. पीणी कमी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
2. जास्त तेल आणि मसाल्यांचे पदार्थ सेवन केल्याने या समस्येला आमंत्रण मिळते. तसेच पोटाचे अन्य आजार उद्धभवतात.
3. सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने बद्धकोष्ठता या सारखी समस्या निर्माण होते. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो.
4. वजन कमी करण्यासाठी कमी खाणे हे देखील बद्धकोष्ठतेचे कारण आहे. त्यामुळे संतुलित प्रमाणात आहार घेणे आवश्यक आहे.
5. पोट दुखी होत असेल तर पेन किलर टॅबलेट घेणे टाळा. पेन किलरचा जास्त वापर करणे योग्य नाही.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी घरगुती उपाय
1. बद्धकोष्ठता समस्या दूर करण्यासाठी गरम पाण्यातून लिंबू आणि एरंडेल तेल हे एकत्र करुन घ्यावे. सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून ते प्यावे. त्यामुळे ही समस्या हळूहळू दूर होत जाते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एरंडेल तेल मिसळून प्यावे. त्यामुळे सकाळी पोट सहज साफ होते.
2. रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा मध टाकून घ्यावे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागते. आणि आपले पोटही निरोगी राहते.
3. गरम पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून ते प्यावे. त्यामुळे पोटाची समस्या दूर होते.
4. त्रिफळा पाण्यात टाकून ते पाणी उकळावे. त्यानंतर थंड पाणी करुन ते प्राशन करणे. हा पोटासाठी रामबाण उपाय आहे.
5. पपई खाणे आरोग्यासाठी आणि पोटासाठी चांगले आहे. पपईने पोट साफ राहते. यात भरपूर व्हिटॅमिन डी आहे. म्हणून, दररोज शिजवलेले पपई खा.
6. अंजीर पाण्यात टाकू ठेवा. त्यानंतर ते खा. तसेच अंजीर दुधासोबतही खाऊ शकता. काही दिवस याचा वापर करा. तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल.
7. आपल्या आहारात पालक असणे गरजेचे आहे. पालक भाजी खाणे किंवा पालक सूफ पिणे नेहमी चांगले. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.