काय सांगता! `या` फळापासून बनवलेल्या मिठाईने झपाट्याने कमी होईल वजन
Fast weight loss tips: वजन कमी करण्यासाठी गोड खाणे टाळताय. पण तुम्हाला माहितीये का या भाजीपासून बनणाऱ्या मिठाईचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहिल.
Fast weight loss tips: वजन कमी करायचे असेल तर गोड पदार्थांपासून लांब रहा, असा सल्ला आहारतज्ज्ञ व जिमच्या ट्रेनरकडूनही दिला जातो. गोड खाल्ल्यामुळंच वजन वाढते. पण तुम्हाला हे माहितीये का एक मिठाई अशीही आहे ज्यामुळं तुमचं वजन कमी होऊ शकते. या मिठाईत अनेक पौष्टिक घटक असतात. जे तुमच्या शरीराला अत्यावश्यक असतात. विशेष म्हणजे ही मिठाई एका फळापासून बनवली जाते. तर पाहूयात कोणती आहे ही मिठाई आणि त्याचे पौष्टिक घटक जाणून घेऊया.
कोहळा ही एक फळभाजी असून त्याला पांढरा भोपळा असंही म्हणतात. आयुर्वेदातही कोहळ्याचे महत्त्व सांगण्यात आलं आहे. संस्कृतमध्ये या भाजीला कुष्मांड असं म्हणतात. कोहळा हे फळ अनेक महिने टिकते. अग्राचा पेठा तर तुम्हाला माहितच असेल. पेठा हा कोहळ्यापासूनच बनवला जातो. कोहळ्यात कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, आयर्न, फायबर, सोडियम व फोलेट सारखे पोषक तत्वे असतात. त्याचबरोबर यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन-ई सारखे गुण आढळतात. जे शरीरासाठी पोषक तत्व म्हणून काम करतात. कोहळ्याची भाजी म्हटलं की अनेकजळ नाकं मुरडतात पण पेठा खावून तुम्ही हा पौष्टिक तत्वे मिळवू शकतात. पेठा खाल्ल्याने वजन कमी करण्याबरोबर अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया.
पेठा खाण्याचे फायदे
कोहण्यात मुबलक प्रमाणात फायबर आढळते. ज्यामुळं आपली पाचनसंस्था मजबूत राहते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होते. ज्या लोकांची शुगर लेव्हल कमी आहे ते कोहळ्याचा ज्यूसदेखील पिऊ शकतात.
पेठ्यात अँटीइंफ्लेमेटरी गुणे असतात. ज्यामुळं लिव्हर मजबूत होते. कोहळ्याच्या बियांना फायबरचा चांगला स्त्रोत मानले जाते. ज्यामुळं टाइप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
डोळे निरोगी ठेवण्यासाठीदेखील ही मिठाई फायदेशीर ठरु शकते. कोहळ्यात आढळणारे अनेक पोषक तत्वांमध्ये बीटा-कॅरोटीनदेखील आढळतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. कोहळ्याला कॅल्शियमचा चांगला स्त्रोत मानलं जातं.
कोहळ्यात अँटी ओबेसिटी गुण आढळतात ज्यामुळं वाढलेले वजन कमी करु शकता.
हृदयविकार असणाऱ्यांनी हृदयाचे बळ वाढवण्यासाठी कोहळा रस किंवा कोहळ्याचे सूप प्यावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)