मुंबई : आज वर्ल्ड मिल्क डे. दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र काहींना दूध पिणे आवडत नाही. मात्र थंड दुधाचे फायदे वाचून तुम्ही लगेचच दूध पिणे सुरु कराल. थंड दुधामुळे केवळ आरोग्यालाच फायदा होत नाही तर सतत भूक लागण्याची समस्या दूर होती. जाणून घ्या थंड दूध पिण्याचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही थंडगार दूध पित आहात तर ते नॉर्मल तापमानावर आणण्यासाठी कॅलरी बर्न करावी लागते त्यानंतर ते पचवावे लागते. यामुळे तुमचा लठ्ठपणा नियंत्रणात राहील. 


कोमट दूध प्यायल्याने झोप येते. दुधामध्ये अमिने अॅसिड ट्रिप्टोफान असते. मात्र थंड दुधामध्ये प्रोटीन असते. यासाठी कोणत्याही वेळेस प्यायले जाऊ शकते.


अॅसिडिटी कमी करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते. 


जेवल्यानंतरही जर तुम्हाला वारंवार भूक लागते तर तुम्ही थंड दूध पिऊ शकता. तुम्हाला हवे असेल तुम्ही थंड दुधात ओट्स मिसळूनही खाऊ शकता. 


उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याची गरज असते. जर दिवसाला दोन ग्लास थंड दूध प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.


जिममध्ये व्यायाम केल्यानंतर एनर्जी ड्रिंक म्हणून थंड दूध घेतल्यास फायदा होतो. यामुळे मसल्स रिपेयर होण्यासाठी प्रोटीन आणि शरीराला एनर्जी मिळते.