मुंबई : लांब नखे ठेवणे हा एक ट्रेंड झाला आहे. मुख्यता मुली लांब नख ठेवतात. ज्यावर ते नेल आर्ट देखील करतात. बरेच लोक आपली नखं वाढवण्यासाठी खूप मेहनक घेतात. त्यात जर त्यांचा नख थोडा जरी तुटला, तर मात्र या लोकांना ते सहन होत नाही. परंतु अशा या फार जवळच्या विषयावर संशोधकांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तसेच लोकांना इशाराही देण्यात आला आहे. संशोधनात असे म्हटले आहे की, मानवी नखे 32 पेक्षा जास्त जीवाणू आणि बुरशीच्या 28 पेक्षा जास्त प्रजातींचे घर असू शकतात. त्यामुळे ज्या लोकांना नख वाढवण्याची हौस असेल, त्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 संशोधकांचे म्हणणे आहे, संशोधनादरम्यान लांब नखांमध्ये स्टॅफ ऑरियस नावाचे बॅक्टेरियाही आढळून आले आहेत.


हा एक असा जीवाणू आहे, जो त्वचेच्या संसर्गास जबाबदार आहे आणि प्रतिजैविकांनी प्रभावित होत नाही. हा जीवाणू नखांच्या अगदी खाली असू शकतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही वस्तूंना स्पर्श करता, तेव्हा हे जिवाणू नखेपर्यंत पोहोचतात आणि तेथे येऊन बसतात.


नखांच्या खाली असलेले बॅक्टेरिया आणि बुरशी उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत, त्यामुळे या अज्ञात धोक्यापासून खूपच सावध राहण्याची गरज आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात या धोक्याबाबत इशारा दिला आहे.


शास्त्रज्ञांच्या मते खाताना, खाजवताना नखेमध्ये असलेले हे बॅक्टेरिया शरीराच्या अनेक भागात पोहोचतात आणि संसर्गास कारणीभूत ठरतात.


संसर्गाची लक्षणे कोणती आणि कशी ओळखायची? जाणून घ्या
डेलीमेलच्या रिपोर्टमध्ये, संशोधकांनी म्हटले आहे की, सहसा हे जीवाणू नुकसान करत नाहीत. पण जर त्याचा गंभीर संसर्ग पसरला तर अनेक समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, नखांच्या भागात सूज येणे, नखं जाड होणं किंवा यासारखी लक्षणे दिसू लागतात.


त्यामुळे आता नख वाढवण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.