हिंगाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
भारतीय मसल्यांना फार महत्त्व आहे.
मुंबई : भारतीय मसल्यांना फार महत्त्व आहे. चवीला उत्तम असलेल्या या पदार्थांमध्ये आरोग्यवर्धक गुणधर्मही आहेत. फोडणीसाठी आर्वजून घातला जाणारा पदार्थ म्हणजे हिंग. अगदी कमी प्रमाणात वापरऱ्या जाणाऱ्या या पदार्थाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हिंगात अॅँटी इंफ्लेमेटरी आणि अॅंटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे अपचन, गॅस, पोटांचे विकार दूर होण्यास मदत होते.
#1. श्वासासंबंधित काही समस्या असल्यास त्या दूर होण्यास हिंग फायदेशीर ठरतं. रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
#2. यातील कोमरिन्स तत्त्वामुळे रक्त पातळ होऊन रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे उच्च रक्तदाबापासून बचाव होतो.
#3. हे फ्रि रेडीकल्सपासून शरीराला वाचवते. हिंगाची कॅन्सरप्रतिबंध गुणधर्म असल्याने कॅन्सरच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध होतो.
#4. यात असलेल्या अॅँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे मासिक पाळीच्या वेळेस होणारा त्रास दूर होतो.