Beer Benefits: 1 ग्लास बिअर प्या, मेमरी शार्प होण्याबरोबरच मिळतील `हे` फायदे
Health Benefits of Beer: बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरतं. अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते.
Benefits of drinking Beer: बिअरचे (Beer) नाव ऐकताच डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे पार्टी. लोक नेहमी आनंदाचे क्षण बिअर पिऊन सेलिब्रेट करतात. तर काही लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी पितात. अल्कोहलिक पेय पदार्थांमध्ये बियर सर्वात वापरला जाणार पेय पदार्थ आहे. यात अल्कोहलची मात्रा इतर प्रकारच्या दारूंपेक्षा कमी असते. बियर मादक असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच बिअर द्राक्षे (Grapes) आणि बार्लीपासून (Barley) बनते. यामध्ये पोषक तत्वे (Nutrients) मोठ्याप्रमाणात आढळून येतात. यामध्ये फ्लेवोनाइड (flavonoids) नावाचे तत्व आणि इतर अंटि ऑक्सिडेंट्स (antioxidant) उपस्थित असतात.
बिअर पिण्यामुळे होणारे फायदे (Benefits of drinking Beer)
- न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिसिन (New England general of medicine) नुसार बिअर पिण्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा (Heart Attack) धोका कमी असतो. हृद्यविकार (heart diseases) असलेल्यांना या आजारातून सुटका होण्यास मदत होते.
- एका अभ्यासानुसार जे लोक बिअर पितात, त्यांच्यात सामान्य लोकांच्या तुलनेत किडनी स्टोन्सची (Kidney Stones) शक्यता कमी असते. यामुळे किडनी स्टोन्सच्या समस्येपासून सुमारे 41 टक्क्यांपर्यंत बचाव होतो.
- योग्य प्रमाणात बिअर घेतल्याने बॅड कॉलेस्ट्रॉल (bad cholesterol) म्हणजेच एलडीएलची समस्या दूर होते. बिअरमध्ये असलेले फायबर ब्लड शुगर आणि ब्लड कॉलेस्ट्रॉलचा (Blood sugar and blood cholesterol) स्तर कमी करतो. त्याशिवाय बॉडीमध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी (Fat) जळण्यास होण्यास मदत होते.
- बियर पिल्याने हाडे मजबूत होतात. हाडांच्या विकासात सिलिकॉनची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी एका नियमित अंतराने ड्रिंक पिल्याने आर्थोसिलिसक ऍसिड (Orthosilicic acid) तयार होते.
- एका संशोधनानुसार रोज एक ग्लास बिअर पिल्याने मानसिक ताण आणि तणावापासून (Stress and tension) सुटका होते. यामुळे डोक्याच्या नसा शांत करण्याचे काम करते. त्यामुळे आपल्याला चांगले वाटते. बिअर पिल्याने झोप न येणे आणि भीती (anxiety) सारखी समस्या दूर होते.
या आजारातही होतो फायदा
- विस्मरणाचा आजार होतो दूर : बिअर पिल्याने स्मरणशक्ती चांगली होते. यामुळे Xanthohumol नावाची कॉग्निटिव्ह फंक्शनला (Cognitive functions) बरे करण्याचे काम करते. त्याचबरोबर ब्रेन सेल्स सुरक्षित राहतात, ज्यामुळे विस्मरणाच्या आजार असेल तर फायदा होतो.
विचारशक्ती वाढवते (Boost memory power)
- बिअर पिल्याने मेंदूची पॉवर वाढते. व्यक्तीची विचार करण्याची क्षमता सुधारते. यामुळे मेंदूतील अडथळ्यांची समस्या दूर होते. संतुलित प्रमाणात बिअरच्या सेवनाने मेंदूतील ऑक्सिजनची पातळी योग्य राहते. पण अधिक प्रमाणात बिअरचे सेवन केल्यास त्याच्या मेंदूवर निगेटिव्ह परिणामही पडतो.
बिअरचे एवढ्या प्रमाणात सेवन करा (What is the Right Dosage of Beer)
- बिअर पिण्याच्या प्रमाणाबाबत लोकांना योग्य माहिती नसते. एका निरोगी व्यक्तीने रोज बिअरचा एक ग्लास पिणे फायदेशीर असते. पण हे त्या व्यक्तीच्या हेल्थ रेकॉर्डवर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीला एखादा जेनेटिक आजार असेल किंवा एखाद्या आजारावर विशेष औषध सुरु असेल तर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिअरचे सेवन करु नये. तसे केल्यास त्याला साइड इफेक्ट्सला सामोरे जावे लागेल.
- बिअर पिण्यापूर्वी व्यक्तीने आपले ब्लड प्रेशर आणि हृदयाची तपासणी केली पाहिजे. बिअर पार्टी ड्रिंक्सप्रमाणे नव्हे तर औषधाप्रमाणे योग्य प्रमाणात घेतले पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त पिल्यास अल्कोहल सिंड्रोम, हायपरटेन्शन आणि पोषक तत्त्वांची कमतरता जाणवू शकते.
- हृदयरोगापासून वाचण्यासाठी रोज एक ते दोन कप बिअर पिणे फायदेशीर असते. हे रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या दूर करण्याचे कार्य करते. त्यामुळे हृद्यविकाराचा झटका येत नाही.
- एका संशोधनानुसार आठवड्यातून 7 ते 14 कप बिअर पिण्याने शरीराचे नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो. तर त्यापेक्षा जास्त बिअर पिल्याने मनुष्याची किडनी फेल होऊ शकते. अशात त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
बिअर पिणे सुरक्षित आहे का (Drinking Beer is safe or not )
- बिअर पिणे आरोग्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत अनेक रिसर्च झाले आहेत. ज्यामध्ये अनेक तथ्ये समोर आली आहेत. रिपोर्ट्सनुसार जर रोज सुमारे १२ औंस बिअरचे सेवन केले तर यामुळे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होत नाही. पण जर त्यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास श्वास घेण्यास त्रास, मानसिक संतुलन बिघडणे, लो ब्लड शुगर डायरिया आणि अनियमित हार्ट बीटसारख्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण होते.
- दिर्घ काळापर्यंत बिअर पिण्यामुळे अस्थमाची तक्रार जाणवू शकते. त्यामुळे श्वास घेण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच बिअरचे सेवन करा.
- जे लोक बिअरबरोबर अल्कोहलचेही सेवन करत असतात. त्यांना झोप न येणे, छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा त्रास जाणवू शकतो. अशा लोकांचा लवकर मृत्यू होऊ शकतो.
- दिवसातून तीनपेक्षा जास्त अल्कोहोलिक ड्रिंक आणि बिअरचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. त्यामुळे हायपरटेंशनचा धोका असतो.
- गरजेपेक्षा जास्त बिअर पिण्यामुळे किंवा दिर्घ काळापर्यंत याच्या सेवनाने नर्व्हस सिस्टिमवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे हाताला थरथरी सुटणे, मानसिंक संतुलन ढासळणे, लिव्हर प्रॉब्लेम इत्यादीची भीती असते.