मुंबई : कपूरचा वापर मुख्यत्वेकरुन पुजेमध्ये केला जातो. मात्र या कापूरचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी कापूर फायदेशीर ठरते. इन्फेक्शन अथवा त्वचेची जळजळ होत असेल तर कापूरचा लेप लावल्यास आराम मिळतो. 


नारळ तेल आणि कापूर मिक्स करुन पिंपल्स, भाजल्यामुळे अथवा जखमांच्या डागांवर लावल्यास फायदा होतो.


सांधेदुखीचा त्रास होत असल्यास कापूरच्या तेलाने मसाज करा. 


त्वचेला खाज येत असल्यास अथवा फंगल इन्फेक्शन जाल्यास नारळ तेल आणि कापूर मिसळून लावा. आराम पडेल. 


जखम झाल्यास अथवा कापल्यास कापूरचे पाणी लावल्याने आराम पडतो. 


नारळ तेलात कापूर मिसळा. त्यानंतर तेल कोमट करून केसांना मालिश करा आणि एका तासानंतर केस धुवा. कोंड्याची समस्या दूर होईल तसेच केस घनदाट आणि मजबूत होतील. 


ऑलिव्ह ऑईलमध्ये कापूर मिसळून डोक्याला मसाज करा. यामुळे डोकेदुखी दूर होईल. 


दात दुखत असल्यास दुखऱ्या जागी कापूरची पावडर लावा. आराम मिळेल. 


सर्दी, पडसे झाल्यास नारळ तेलात कापूर मिसळून छाती आणि डोक्यावर लावा. यामुळे आराम मिळतो. 


रात्री झोपताना कच्च्या दुधात कापूर पावडर मिसळून लावला. कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा स्वस्थ आणि चमकदार होईल. 


तोंड आल्यास कापूर देशी तुपामध्ये मिसळून लावा. फायदा होईल.