मुंबई : नारळाचं तेल हे अन्नपदार्थ बनवण्यापासून ते अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी वापरलं जातं. नारळाच्या तेलाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे केवळ केसांच्या वाढीसाठी नव्हे तर या आरोग्यदायी फायद्यांसाठीही नारळाच्या तेलाचा वापर करा. 
 
 नारळाच्या तेलामध्ये मेटॅबॉलिझम सुधारण्याची क्षमता आहे. नारळाचे तेल पचायला हलकं आहे.  यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. सोबतच पित्ताशयावर आलेला दाब हलका करण्यास मदत होते. 
 
 नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. यामुळे चेहर्‍यावरील जंतूचा त्रास कमी करण्यास मदत होते. 
 
 नारळाच्या तेलामध्ये अन्न बनवल्यास त्याच्या सेवनाने पचनसंस्थेतील कीटाणूंचा नाश होण्यास मदत होते. 
 
 नारळाच्या तेलात फॅटी अ‍ॅसिड असते त्यामुळे त्याच्या सेवनामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते. 
 
 नारळाच्या तेलामुळे त्वचा, केस यांचे पोषण होण्यास मदत होते. शरीरातील वेदना, सूज कमी करण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 
 
 नारळाच्या तेलातील मीडियम-चेन ट्रिग्लिसेराइड्स घटक मांसपेशींना मजबुत करण्यास मदत होते. नारळाच्या तेलातील कॅप्रिक अ‍ॅसिड भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.