मुंबई : हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैली, खाण्यापिण्याचे बिघडलेले वेळापत्रक याचा परिणाण थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे हृद्यविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह सारख्या समस्या सतावतात. रक्तदाबाच्या समस्येवर गुणकारी उपाय म्हणजे खजूर.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दररोज तीन खजुराचे सेवन केल्यास रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. यात व्हिटामिन, मिनरल्स आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. तसेच 
खजूरमध्ये पॉटेशियमचेही प्रमाण अधिक असते ज्याची शरीराला गरज असते. 


याशिवाय खजुरामध्ये व्हिटामिन बी१, बी२, बी३, बी५, ए१ आणि व्हिटामिन सी ही असते. यामुळे खजूर खाण्याने शरीराला फायदाच होतो. यासाठी रोज सकाळी नाश्त्याआधी तीन खजूर आवर्जून खावेत आणि त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे. महिनाभर हा उपाय केल्यानंतर हळूहळू रक्तदाब नियंत्रणात आल्याचे जाणवेल.