या ४ आरोग्यदायी फायद्यांसाठी रक्तदान करा!
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.
मुंबई : रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशन्टचे प्राण वाचण्यास मदत होते. तसंच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. आपण रक्ताची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे रक्तदान करणे हा रक्त मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे रक्तदान करून गरजूंना मदत करणे महत्त्वाचे आहे. या मदतीचा फायदा नक्कीच आपल्याला होतो. पाहुया काय आहेत फायदे...
हृदयाचे कार्य सुधारते
नियमित रक्तदान केल्यास आयर्नचे प्रमाण सुधारते. शरीरात आयर्नचे प्रमाण वाढले तर ऑक्सीडेटिव्ह डॅमेज होते, त्यामुळे टिशू डॅमेज होतात. रक्तदान केल्याने शरीरात आयर्नचे प्रमाण ठिक होते त्याचबरोबर हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. यामुळे एजिंग, स्ट्रोक आणि हार्ट अॅटकपासून बचाव होतो.
वजन कमी करण्यास मदत
एक वेळेस रक्तदान केल्याने 650-700 किलो कॅलरीज कमी होतात. परिणामी वजनही कमी होते. मात्र ३ महिन्यातून एकदा रक्तदान करणे, सुरक्षित आहे.
मानसिक समाधान
रक्तदान करणे खास असते, यात कोणतीही शंका नाही. गरजवंतांना मदत केल्याचे समाधान मिळते. तुम्ही केलेले रक्तदान ३-४ वेगवेगळ्या रुग्णांना कामी येते. त्यामुळे आनंद आणि समाधान लाभते.
यकृतांचे आजार आणि कॅन्सरचा धोका कमी
रक्तदान केल्यामुळे यकृतांचे आजार आणि कॅन्सरचा धोका कमी होतो, असे कोणत्याही अभ्यासातून सिद्ध झालेले नसले तरी रक्तदानाचा यकृतावर पॉसिटीव्ह (सकारात्मक) परिणाम होतो. त्याचे कार्य आयर्न मेटॅबॉलिझम वर अवलंबून असते. शरीरातील आयर्नच्या अतिरिक्त प्रमाणामुळे यकृतावर प्रेशर येतं. रक्तदान केल्याने रक्तातील आयर्नचे प्रमाण स्थिर राहते. त्यामुळे लिव्हर खराब होण्याचा धोका कमी होतो. तसंच लिव्हरमध्ये अतिरिक्त आयर्न साठल्यास लिव्हर टिशुचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे लिव्हर खराब होते. हे अति प्रमाणात झाल्यास कॅन्सर होऊ शकतो. आणि म्हणून नियमित रक्तदान केल्यास लिव्हर कॅन्सरची शक्यता कमी होते.